Gold Price Today: सोनं-चांदीत मोठी घसरण! आजच खरेदीची संधी की आणखी पडणार दर?

Total Views |
 
Gold Price Today
 
मुंबई: (Gold Price Today) जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावाचा परिणाम आता थेट सोनं-चांदीच्या बाजारावर दिसू लागला आहे. विशेषतः मध्य पूर्व भागातील संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली असून किमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. (Gold Price Today)
 
सोमवार, ३० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी दोन्ही धातूंमध्ये घसरण नोंदवली गेली. सोन्याच्या किमतीत सुमारे १.३८% घट होऊन ते ४४६२ डॉलर प्रति औंसवर आले, तर चांदीच्या दरात जवळपास २% घसरण होऊन ते ६८.३ डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आले. या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही स्पष्टपणे दिसून आला आहे. (Gold Price Today)
 
भारतातील प्रमुख शहरांतील सोन्याचे आजचे दर (Gold Price Today)
 
मुंबई:
 
२४ कॅरेट – ₹१,४८,०८०
२२ कॅरेट – ₹१,३५,७४०
 
दिल्ली:
 
२४ कॅरेट– ₹१,४८,२१०
२२ कॅरेट – ₹१,३५,८९०
 
चेन्नई:
 
२४ कॅरेट – ₹१,४९,०१०
 
पुणे आणि बंगळुरू:
 
२४ कॅरेट – ₹१,४८,०८०
२२ कॅरेट – ₹१,३५,७४०
 
चांदीचे दर
 
चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली असून ३० मार्च रोजी दर प्रति किलो ₹२,४४,९०० पर्यंत खाली आला आहे. काही महिन्यांपूर्वी ४ लाखांचा टप्पा पार केलेल्या चांदीसाठी ही घसरण मोठा बदल मानली जात आहे. (Gold Price Today)
 
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती, त्यामुळे सध्याची घसरण तात्पुरती आहे की दीर्घकालीन ट्रेंड सुरू होणार आहे, याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमती यावर पुढील दिशा ठरणार आहे. (Gold Price Today)
  

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com