मुंबई : (Rupali Chakankar) भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतू. त्या सोमवारी एसआयटी चौकशीला गैरहजर राहिल्या.
नाशिक येथील भोंदुबाबा अशोक खरात याला महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यादरम्यान, रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच त्या खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्ट या संस्थानवर संचालक असल्याचेही समोर आले.
दरम्यान, एसआयटीकडून शिवनिका आजी-माजी ट्रस्टींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी ही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, रुपाली चाकणकर या चौकशीसाठी एसआयटी समोर हजर झाल्या नाहीत. त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती पुढे येत असून आता एसआयटीने खरातच्या मोबाईल डेटाची सखोल चौकशी केली. त्याच्या मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे याप्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....