मुंबई : (Devendra Fadnavis On LPG Crisis) देशात आणि राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे, अशी स्पष्ट माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंधन तुटवडा आणि लॉकडाऊनसंदर्भातील अफवांवर त्यांनी कठोर भूमिका घेत, “अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गोंधळ निर्माण करणं हे देशविरोधी कृत्य आहे,” असा इशारा त्यांनी दिला आहे. (Devendra Fadnavis On LPG Crisis)
मुख्यमंत्री म्हणाले की, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि पंतप्रधानांच्या धोरणांमुळे देशात इंधनपुरवठा सुरळीत राहील, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. "शहरांमध्ये महानगरच्या माध्यमातून पीएनजी गॅस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. याचं काम जलदगतीने सुरू आहे. त्यासंबंधी सरकारने एक आदेश काढलेला आहे. शहरांवरील एलपीजीचा लोड कमी करून पीएनजीवर भर दिला जाणार आहे. पीएनजीमुळे एलपीजीची भविष्यात समस्या किंवा अडचण येणार नाही." (Devendra Fadnavis On LPG Crisis)
पुढे ते म्हणाले कि, "आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या देशात मात्र त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. जरी तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर पडू दिला नाही. एलपीजी गॅसचाही कुठेही तुटवडा नाही. देशात जर कुणी अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन होणार असल्याच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर कारवाई केली जाणार आहे." (Devendra Fadnavis On LPG Crisis)
एलपीजीऐवजी पीएनजीवर भर?
सरकार शहरांमध्ये पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) पुरवठा वाढवण्यावर भर देत आहे. यामुळे भविष्यात एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महानगरांमध्ये पीएनजी कनेक्शन जलदगतीने वाढवण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis On LPG Crisis)
शहरांवरील एलपीजीचा लोड कमी करून पीएनजीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात गॅस तुटवड्याची समस्या निर्माण होणार नाही. (Devendra Fadnavis On LPG Crisis)
दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबल यांनी या मुद्द्यावर वेगळे संकेत दिले आहेत. आखाती भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यांत एलपीजीऐवजी पीएनजीवर पूर्ण भर दिला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. (Devendra Fadnavis On LPG Crisis)
भुजबळांनी केंद्र सरकारच्या पत्राचा हवाला देत, “संभाव्य तुटवडा लक्षात घेता पीएनजी जोडण्या वाढवण्यावर भर आहे. त्यामुळे भविष्यात एलपीजी पुरवठा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे स्पष्ट केले. (Devendra Fadnavis On LPG Crisis)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.