मुंबई : (Gold Price Today) या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. २९ मार्च रोजी रविवार असल्यामुळेमल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि COMEX (COMEX) या आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये व्यवहार बंद होते. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (२७ मार्च) रोजी MCX वर सोन्याचा दर १,४७,२७० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा दर २,२७,७५० रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला. (Gold Price Today)
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) (Gold Price Today)
दिल्ली
२४ कॅरेट - १,४८,२२० रुपये
२२ कॅरेट - १,३५,९०० रुपये
१८ कॅरेट - १,११,२२० रुपये
मुंबई
२४ कॅरेट - १,४८,०९० रुपये
२२ कॅरेट - १,३५,७५० रुपये
१८ कॅरेट - १,११,०७० रुपये
चेन्नई
२४ कॅरेट - १,४९,०२० रुपये
२२ कॅरेट - १,३६,६०० रुपये
१८ कॅरेट - १,१४,००० रुपये
कोलकाता आणि हैदराबाद
२४ कॅरेट - १,४८,०९० रुपये
२२ कॅरेट - १,३५,७५० रुपये
१८ कॅरेट - १,११,०७० रुपये
अहमदाबाद
२४ कॅरेट - १,४८,१२० रुपये
२२ कॅरेट - १,३५,८०० रुपये
१८ कॅरेट - १,११,१२० रुपये
लखनऊ
२४ कॅरेट - १,४८,२२० रुपये
२२ कॅरेट - १,३५,९०० रुपये
१८ कॅरेट - १,११,२२० रुपये
लग्नसराईत दरवाढीची शक्यता (Gold Price Today)
तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत लग्नाचा हंगाम सुरू होत असल्यामुळे सोन्या-चांदीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. भारतात लग्नसराईत दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते, त्यामुळे दरांवर दबाव येऊन किंमती वाढू शकतात. तसेच मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा ‘सेफ हेवन’ म्हणून सोन्याकडे वळत आहेत, ज्यामुळे बाजारात अस्थिरता वाढत आहे. (Gold Price Today)