PM Modi to meet CMs: पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक! कोणत्या विषयांवर होणार चर्चा?

देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी केंद्र आणि राज्य एकत्र!

    27-Mar-2026   
Total Views |

PM Modi to meet CMs

मुंबई : (PM Modi to meet CMs)
मध्य पूर्वेत सुरु असलेल्या अमेरिका- इस्रायल विरुद्ध इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार दि. २७ मार्चला रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्षामुळे उद्भवणाऱ्या जागतिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक मजबूत रणनीती या बैठकीत ठरवली जाईल. (PM Modi to meet CMs)

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत, इराणमधील अलीकडील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा केली जाईल. तसेच राज्यांच्या तयारी आणि योजनांचा आढावा घेतला जाईल. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तिथे राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत एक स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. (PM Modi to meet CMs)

राज्यांशी समन्वय साधणे आणि संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी एक मजबूत रणनीती तयार करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. पश्चिम आशियातील संघर्षासंदर्भात पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. (PM Modi to meet CMs)



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\