Balendra Shah: बालेंद्र शाह बनले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान! जेन-झींच्या नेतृत्वाचा उदय

    27-Mar-2026   
Total Views |

Balendra Shah

मुंबई : (Balendra Shah)
नेपाळच्या राजकारणात आजपासून एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध रॅपर तथा राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेंद्र शाह हे नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यांनी शुक्रवारी २७ मार्च रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी नेपाळचे आजपर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान होऊन त्यांनी एक विक्रम रचला.(Balendra Shah)

हेही वाचा - Petrol Diesel Excise Duty Cut: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात, सर्वसामान्यांना दिलासा

जेन-झींच्या नेतृत्वाचा उदय

जेन-झी चळवळीचा चेहरा म्हणून उदयास शाह नेपाळचे ४७वे पंतप्रधान ठरले आहेत. शाह यांनी पूर्व नेपाळातील झापा-५ मतदारसंघात माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा ४९,६१४ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. शाह यांना ६८,३४८ मते मिळाली, तर ओली यांना १८,७३४ मते मिळाली. १९९१ नंतरच्या नेपाळच्या संसदीय निवडणुकांमध्ये कोणत्याही उमेदवाराला मिळालेल्या मतांपैकी हे सर्वाधिक मत असल्याचे मानले जाते.(Balendra Shah)

हिंदू आणि बौद्ध परंपरेनुसार शपथविधी

राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या उपस्थितीत 'शीतल निवास' येथे दुपारी १२:३४ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, या सोहळ्यात हिंदू आणि बौद्ध परंपरांचा अप्रतिम संगम बघायला मिळाला. यावेळी, ब्राह्मणांनी शंखनाद केला, १०८ युवा ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केले तसेच १०७ लामांनी बौद्ध मंत्रांचे पठण केले.(Balendra Shah)

कोण आहेत बालेंद्र शाह?

बालेंद्र शाह हे ३५ वर्षांचे संगीतकार असून २०२२ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काठमांडूच्या महापौरपदाची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवून विजय मिळवला. नेपाळमधल्या मधेशी या भागातले ते पंतप्रधानपदी पोहोचलेले पहिले व्यक्ती ठरतील. नुकत्याच मार्च २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने २७५ पैकी १८२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले.(Balendra Shah)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\