नाशिकमधील प्रचंड चर्चेत असलेलं भोंदूबाबा प्रकरण आता आणखी गंभीर वळण घेत आहे. स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्याविरोधात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आर्थिक फसवणूक, अघोरी विधी आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आता मोठ्या आर्थिक घोटाळ्यांची भर पडली आहे. या प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी गंभीर आरोप करत सांगितले आहे की, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे उभारण्यात आलेल्या आलिशान फार्महाऊससाठी खरातने कोट्यावधी रुपये त्यांच्याकडून उकळले. इतकंच नाही तर या फार्महाऊससाठी तुर्कस्थानातून विशेष फर्निचर मागवण्याचा उल्लेख करत “हे फर्निचर नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल” असं म्हणत, राजेंद्र जासूद यांनाच तब्बल अडीच कोटी रुपयांचे फर्निचर मागवण्यास भाग पाडले. यासोबतच एसआयटीचा तपासही वेगाने सुरू असून, गुरूवार दि. २६ मार्च रोजी खरात जेथे महिलांचे लैंगिक शोषण करायचा त्या कार्यालयाची देखील तपासणी करण्यात आली. मात्र एसआयटीच्या तपासात नेमकं काय आढळलं? आलिशान फार्महाऊसचा नेमका काय विषय आहे? आणि राजेंद्र जासूद यांच्या तक्रारीत आणखी कोणते आरोप करण्यात आले आहेत? (Ashok Kharat case)
राजेंद्र जासूद या पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून भोंदू खरातवर ५ कोटींचा गंडा घातल्याचा आठवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जासूद यांच्या तक्रारीनुसार, परदेशात लॉजिस्टिक व्यवसाय सुरू करण्यासाठी आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने त्यांचा अशोक खरात याच्याशी संपर्क आला. मात्र, हा संपर्क त्यांना मोठ्या आर्थिक फसवणुकीत ओढणारा ठरला. जून २०२२ मध्ये त्यांना नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलावण्यात आले. तेथे ‘उत्तरपूजा’ करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला. “ही पूजा न केल्यास मृत्यू होईल,” अशी भीती दाखवली गेली. मंदिराच्या मागील भागात रिंगण आखून त्यातून बाहेर पडल्यास मृत्यू अटळ अशी धमकी देण्यात आली. या भीतीपोटी त्यांनी ९० लाख रुपयांचे फर्निचर आणि पुण्यातील टिंबर मार्केटमधून २९ लाख रुपयांचे सागवान लाकूड खरातला देऊ केले. या संपूर्ण प्रकरणात फार्महाऊस बांधकाम आणि इंटेरिअरसाठी एकूण २.५ कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हे फार्महाऊस १३ कोटी रुपयांच्या बेसॉल्ट दगडांपासून बांधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Ashok Kharat case)
धक्कादायक बाब म्हणजे या आलिशान फार्महाऊसमधील केवळ किचनसाठीच ४२.५ लाख रुपये खर्च करण्यात आले. विविध इलेक्ट्रॉनिक्स आणि सजावटीच्या वस्तू देखील जासूद यांच्याकडूनच खरेदी करून घेण्यात आल्या. २०१९ ते २०२२ या काळात ‘उत्तरपूजे’च्या नावाखालीच तब्बल १ कोटी ११ लाख रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप जासूद यांच्याकडून करण्यात आला आहे. (Ashok Kharat case)
जासूद यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, खरातने ‘परिसाच्या शक्ती’चे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले. “पूजा न केल्यास नागदेवता दंश करून मृत्यू होईल,” अशी भीती घालून त्यांच्याकडून तब्बल ९० लाख रुपयांची मर्सिडीज कार स्वतःच्या नावावर करून घेतली. इतकंच नाही तर ‘२१ देशांच्या मातीला स्पर्श केल्याशिवाय ग्रहदोष दूर होणार नाहीत’ असा दावा करत परदेश दौरे, विमान प्रवास, राहण्याचा आणि खाण्याचा सर्व खर्चही वसूल केला. (Ashok Kharat case)
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) करत आहे. गुरुवारी, २६ मार्च रोजी एसआयटीकडून खरातच्या त्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली, जिथे महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. तपासानंतर हे कार्यालय सील करण्यात आले आहे. तपासादरम्यान ‘शिवानिका’ या संस्थेची बँक खाती गोठवण्यात आली असून, आरोपीच्या मालमत्तेचा शोध सुरू आहे. आतापर्यंत तब्बल ५२ मालमत्तांचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat case)
दरम्यान, न्यायालयाने अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी मिरगाव येथील फार्महाऊसमधून पिस्तूल, ५८ अश्लील व्हिडिओ आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. याशिवाय ‘तुर्की एल्विश हनी’च्या नावाखाली महागड्या दरात मध विकून मनी लॉन्डरिंग केल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. तपासाच्या दरम्यान मंदिरातील पुरोहित आणि वॉचमन यांचीही चौकशी सुरू आहे. (Ashok Kharat case)
एकूणच, हे प्रकरण केवळ अंधश्रद्धेपुरते मर्यादित नसून, लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि संभाव्य मनी लॉन्डरिंग अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचं मिश्रण असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यभरात या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून, आणखी किती जण या जाळ्यात अडकले होते?, किती संपत्ती उभी करण्यात आली आणि या सर्वामागे आणखी कोणाचा हात आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणाचे नवे धागेदोरे समोर येत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ashok Kharat case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.