मुंबई (अक्षय मांडवकर) - इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गवताळ सफारी क्षेत्रात लांडगा आणि कुत्र्याच्या मिलनातून जन्मास आलेल्या पिल्लांचे विलगीकरण करण्यात आले आहे (wolf-dog hybrid). शुक्रवार दि. २० मार्च रोजी वन विभागाने तीन संकरित पिल्लांचे नैसर्गिक अधिवासामधून विलगीकरण केले असून त्यांना पुण्यातील बावधन वन्यजीव बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे (wolf-dog hybrid). याठिकाणी संकरित पिल्लांच्या वर्तनाची महत्वपूर्ण निरीक्षणे टिपण्यात आली आहेत (wolf-dog hybrid). पुढील काही दिवसांप्रमाणे भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) यांच्याकडे संकरित पिल्लांचे नमुने संकरणाच्या दृष्टीने तपासण्याकरिता पाठिवण्यात येणार आहेत (wolf-dog hybrid). या संकरित पिल्लांमुळे भविष्यात लांडग्यांच्या मूळ जनुकीय साखळीला धोका निर्माण होणार असल्याने पुणे वन विभागाने उचलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरले आहे.
(wolf-dog hybrid)
२०२५ च्या हिवाळ्यातील भारतीय राखी लांडग्याच्या विणीच्या हंगामात पुण्यातील कडबनवाडी गवताळ सफारी क्षेत्रात कुत्रा आणि लांडग्याचे प्रत्यक्ष मिलन होतानाची छायाचित्रित नोंद झाली. त्यानंतर या मिलनामधून जन्मास आलेल्या चार पिल्लांचाही नोंद करण्यात आली. ही पिल्ले हुबेहुब कुत्र्याच्या पिल्लांसारखी दिसत होती. मात्र, त्यांचा सांभाळ दोन प्रौढ लांडग्यांकडून केला जात होता. ही पिल्ले मोठी होऊन त्यांनी प्रजननास सुरुवात केल्यास लांडग्यांच्या जनुकीय साखळीला मोठा धोका निर्माण होणार होता. त्यामुळे या पिल्लांना वेळीच वेगळे करण्याची गरज होती. या कारणामुळे शुक्रवारी पुणे वन विभागाने या संकरित पिल्लाचे नैसर्गिक अधिवासातून विलगीकरण केले.
पुणे वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार पिल्लांपैकी तीन पिल्लांचे विलगीकरण करण्यात आले असून एक पिल्लू अजूनही लांडग्यासोबत आहे. येत्या काळात त्याचे देखील विलगीकरण करण्यात येईल. ही पिल्ले सध्या बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रात आहेत. संकरित झालेल्या लांडग्यांचे वर्तनात झालेले बदल आणि शाररिक बदल, असे दोन प्रकार आपण ढोबळमानाने पाडू शकतो. काही वेळा संकरित लांडग्यांचे वर्तन हे त्यांचा मूळ वर्तनाशी समरूप म्हणेज हिंस्त्र स्वरुपाचे असते. मात्र, त्याच्या अवयवाची ठेवण आणि रंगसंगती ही कुत्र्यांसारखी असते. तर दुसऱ्या प्रकारात शाररिक ठेवण ही मूळ जंगली लांडग्यासारखीच असते. परंतु, वर्तन हे कुत्र्यांसारखे मैत्रीपूर्ण झाल्यासारखे दिसते. कडबनवाडीतील ही पिल्ले जरी कुत्र्याच्या पिल्लांसारखी दिसत असली, तरी त्यांचे वर्तन हे लांडग्यांसारखे आहे. त्यामुळे या पिल्लांमध्ये लांडग्यांचे जनुकीय प्रमाण किती आहे, हे तपासण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने हे 'डब्लूआयआय'कडे तपासण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.
विलगीकरण महत्त्वाचे का ?
भटक्या कुत्र्यांचे अशा स्वरुपाचे आक्रमण हे मूळ जंगली लांडग्यांना तीन प्रकारे प्रभावित करताना दिसते. एक म्हणजे शिकारीसाठी स्पर्धेत वाढ, दुसरे म्हणजे 'कैनाईन डिस्टेंपर'चे संक्रमण आणि तिसरे म्हणजे संकर (हायब्रिटायजेशन). महाराष्ट्रात भारतीय राखाडी लांडगा आढळत असून, राज्यात त्यांचे अधिवास क्षेत्र साधारण ४० हजार, ११४ चौरस किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. राज्यातील लांडग्यांची संख्या अंदाजे ४०० एवढी गंभीर आहे. 'आययूसीएन'च्या लाल यादीत या लांडग्याला 'व्हल्नरेबल' म्हणजेच 'असुरक्षित' श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान मिळून त्यांची संख्या केवळ २,८७७ ते ३,३१० च्या घरात उरली आहे. अशा परिस्थितीत गवताळ प्रदेशांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढलेला वावर पाहता अशा संकरित प्रजाती जन्मास आल्यास भविष्यात राज्यात मूळ जंगली लांडगे शिल्लक राहतील का ? हा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे.