अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; ‘मला काही माहिती नाही’ म्हणत खरातची न्यायलयात मोजकी प्रतिक्रिया

तपासात धक्कादायक बाबी; शस्त्र, रोकड आणि संशयास्पद कृत्यांचा उलगडा

    24-Mar-2026
Total Views |
Ashok Kharat
 
नाशिक : (Ashok Kharat) महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरात याला मंगळवार, दि. २४ मार्च रोजी नाशिक सत्र न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याला दुपारी ३.५० वाजता न्यायालयात हजर केले असता आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले याबाबत पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली. तसेच पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने अशोक खरातला पाच दिवसांची म्हणजेच २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
 
३० वर्षांच्या मुलींचे लैंगिक शोषण
 
अशोक खरात याच्याकडे काही कागदपत्रे सापडले आहेत. तसेच सहा लाख ५३ हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळ्या रंगाच्या हस्तगत केलेल्या रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा आहे. ३१ काडतुसे, त्यात पाच फायर झाले असून ते कुठे फायर झाले. त्याने नरबळी दिल्याचा संशय आहे. अशोक खरात हा ६७ वर्षांचा असून ३० वर्षांच्या मुलींसोबत लैंगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. तसेच हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली, त्यांची हत्या केल्याचा संशय असून त्याचा शोध घ्यायचा आहे.फॉरेस्ट अ‍ॅक्ट लागू शकतो त्यामुळे सात दिवस पोलीस कोठडीचा सरकारी वकीलांनी मागणी केली होती.
 
पेन ड्राइव्हचा उल्लेख नाही
 
सात दिवसांपासून तपास सुरू असून रिमांडची गरज नाही. काही व्हिडिओ जमा केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डीव्हीआर, लॅपटॉप, पैसे, आणि रिव्हॉल्व्हर मिळाल्याचे सांगितले जात आहे, पण पेन ड्राइव्ह कुठे उल्लेख आला नाही, असा युक्तिवाद आरोपी अशोक खरातचे वकील संजय भाटे यांनी केला.
 
हेही वाचा : भोंदुबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्या सर्वांचीच चौकशी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
साप, वाघ यांविषयी माहिती नाही
 
न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना अशोक खरात मान खाली घालून स्वतःच्या हाताचे बोटं पाहत होता. न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर कोठडी सुनावण्याआधी तुम्हाला काही बोलायचे आहे का?, असा प्रश्न विचारला. यावर, मला साप, वाघ यांविषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरात कधीतरी जायचो. त्यावेळी १०० च्या आसपास लोक असायचे. शिवरात्र, श्रावणी सोमवारी अशा वेळी जात होतो. पाच दिवसांच्या कोठडीत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचे खरात म्हणाला.
 
खरात स्वतःला सिद्ध पुरुष सांगायचा
 
अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी गुन्ह्याची माहिती देतानाआरोपी खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा, पाणी प्यायला द्यायचा त्यानंतर मळमळ व्हायची.पेढा आणि पाणी कुठून आणायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे.आरोपीच्या फार्महाऊसमध्ये पिस्तुलच्या पाच रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. ते कुठे फायर केले, ते बघायचे आहे.आरोपी स्वतःला सिद्ध पुरुष सांगत होता आणि फसवणूक करायचा.त्याने किती महिलांची फसवणूक केली हे तपासायचे असल्याचे न्यायालयाला सांगितले.