तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआला सह आरोपी करायचं का ? - नवनाथ बन
22-Mar-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) "याच भोंदू बाबाला पायघड्या घालणाऱ्या मविआ सरकार तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांना सह आरोपी करायचं का ? याच उत्तर संजय राऊत यांनी द्यावे.कारण दुष्काळात लोकांना पाणी न्हवते तेव्हा मविआ सरकारने याच भोंदूबाबा साठी पाणी उपलब्ध करून दिले होते.२००३ ला भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर १५ वर्षांनी मविआ सरकार आले. त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. तेव्हा या भोंदूबाबावर कारवाई करायची हिंमत एकाचीही झाली नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षात आल्याबरोबर या भोंदू बाबावर कारवाई करण्यात आली आहे." असा रोखठोक सवाल भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.२२ रोजी केला.
"उबाठा गटाच्या खासदारांची बैठक मुंबईत बोलावली असताना संजय राऊत यांनी या बैठकीपासून दूर राहणे पसंद केले आहे. कारण आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना उबाठा मध्ये जोरात सुरू आहे.उबाठात सध्या दोन गट पडले आहेत.येणाऱ्या काळात संजय राऊत काँग्रेसचा पदर धरताना दिसतील. तसेच संजय राऊत यांना खासदार ,आमदारांच्या निधीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण ज्या वेळेस मविआ सरकार होते.तेव्हा भाजपा आमदारांना दमडी देखील दिली गेली न्हवती. भाजपाच्या १२ आमदारांचे अनधिकृतरित्या निलंबन केले होते."असा घणाघात नवनाथ बन यांनी केला.
"देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये.त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते. त्याच्याविरोधात पश्चिम बंगालची जनता भाजप सोबत उभी राहील. ज्याप्रकारे मविआचे अडीच वर्षाचे सरकार जनतेवर अन्याय ,अत्याचार करत होते.तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार करीत आहे. त्यामुळे तिथे भाजपचे सरकार निश्चित येईल. ज्याप्रकारे उबाठाची अवस्था राज्यात झाली तशी अवस्था पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची होईल." असेही रोखठोक मत नवनाथ बन यांनी व्यक्त केले.