मुंबई : (Kharat Case) "हवेत बोलण्याला काही अर्थ नसतो. खरात यांच प्रकरण अत्यंत गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केला आहे. सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत.त्यामुळे अशाप्रकारे जे पीडित आहेत त्यांना , त्यांच्या घरच्यांना धीर देऊन समोर आणण्याचा प्रयत्न चालला आहे.काही प्रमाणात महिला प्रतिसाद देखील देत आहेत.यात एस. आय. टी.तयार केली आहे.या प्रकरणास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालला आहे.कुणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा त्याच्यावर कारवाई होईल." असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि.२२ रोजी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले. (Kharat Case)
"विरोधी पक्षातील कोण कोण तिकडे जायचे त्याचे मी पुरावे देऊ शकतो. ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून ४० किमी दुरून त्यांना पाणी दिले त्यांना काय शिक्षा द्यायची.मंत्र्यांबद्दल बोलणारे तिथे का गप्प आहेत. निवडक का बोलत आहेत.खरातना ४० किमी पाण्याची लाईन कुणी दिली हे सगळे माध्यमांनी दाखवले आहे.यात राजकारण करू नये.हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.खरातना भेटणाऱ्यापैकी कोण यात सहभागी असेल तर कारवाई होईल.आपल्या तथाकथित शक्तीचा वापर करून महिलाना भरीस पाडणे यासारखा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झाले तरी त्यांना याची शिक्षा भोगावीच लागेल.सरकार आणि पोलिस याकरिता जे करायला लागेल ते करायला तयार आहे." असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Kharat Case)
"ज्या महिलांसोबत त्यांनी दुर्व्यव्यवहार केला आहे त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. महिलांच्या संदर्भात पहिल्यांदा चौकशी होईल.तसेच जिथे आर्थिक व्यवहार असतील तिथे देखील चौकशी केली जाईल."असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Kharat Case)