Income Tax Rules: १ एप्रिलपासून मोठे बदल! नवीन आयकर कायदा लागू; तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम?

Total Views |
Income Tax Rules
 
मुंबई: (Income Tax Rules) भारत सरकार ने ‘आयकर अधिनियम २०२५’ची अधिसूचना जारी केली असून हा नवा कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे. तब्बल ६४ वर्षे जुन्या आयकर अधिनियम १९६१ ची जागा घेणारा हा कायदा करप्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने आणण्यात आला आहे. (Income Tax Rules)
 
तज्ज्ञांच्या मते, या बदलांमुळे कर भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल, वाद-खटले कमी होतील आणि करदात्यांवरील ताणही कमी होईल. मात्र, करदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (Income Tax Rules)
 
महत्त्वाचे बदल कोणते? (Income Tax Rules)
 
१. ‘टॅक्स इयर’ची संकल्पना...
 
आता ‘फायनान्शियल इयर’ आणि ‘असेसमेंट इयर’ऐवजी एकच ‘टॅक्स इयर’ लागू होणार आहे. त्यामुळे कर कॅल्क्युलेशनमधील गोंधळ कमी होणार आहे. (Income Tax Rules)
 
२. ITR भरण्याच्या नवीन मुदती...
 
ITR-1, ITR-2 (साधारण करदाते): ३१ जुलै
ITR-3, ITR-4 (व्यवसाय/प्रोफेशन): ३१ ऑगस्ट
ऑडिट प्रकरणे/कंपन्या: ३१ ऑक्टोबर
विशेष प्रकरणे: ३० नोव्हेंबर
 
तसेच सुधारित रिटर्न (Revised Return) आता टॅक्स इयर संपल्यानंतर १२ महिन्यांपर्यंत भरता येणार आहे. (Income Tax Rules)
 
३. HRA नियम अधिक कडक...
 
मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, बंगळूरु येथे पगाराच्या ५०% पर्यंत HRA सूट, इतर शहरांसाठी ४०% मर्यादा कायम, १ लाखांपेक्षा जास्त भाडे असल्यास घरमालकाचा PAN अनिवार्य (Income Tax Rules)
 
४. कंपनीकडून मिळणाऱ्या घर आणि कारवर कर सवलत...
 
घराच्या टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये घट (पूर्वी १५%, आता ५%-१०%)
 
कंपनी कार:
 
लहान कार: ₹५,०००/महिना
मोठी कार: ₹७,०००/महिना
ड्रायव्हर असल्यास अतिरिक्त ₹३,०००
 
५. फूड, गिफ्ट आणि अलाऊन्सवर मोठी सूट...
 
फ्री फूड/बेव्हरेज: ₹२०० प्रति मील (पूर्वी ₹५०) 
गिफ्ट/व्हाउचर: ₹१५,००० पर्यंत टॅक्स फ्री
एज्युकेशन अलाऊन्स: ₹३,०००/महिना (पूर्वी ₹१००)
हॉस्टेल अलाऊन्स: ₹९,०००/महिना (पूर्वी ₹३००)
 
६. कॅपिटल गेन नियम स्पष्ट?
 
शेअर्स किंवा सिक्युरिटी कन्व्हर्जनच्या बाबतीत होल्डिंग कालावधी ठरवण्याचे नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत, ज्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर होणार आहे. (Income Tax Rules)
 
कडक नियम आणि जबाबदाऱ्या वाढणार? (Income Tax Rules)
 
कॅपिटल गेन, शेअर बाजार आणि NRI टॅक्सेशनमध्ये कडक अंमलबजावणी, १५० पेक्षा जास्त नवीन फॉर्म्स, ऑडिटर्स आणि कंपन्यांवर अधिक जबाबदारी
 
तज्ज्ञ काय म्हणतात? (Income Tax Rules)
 
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया चे माजी अध्यक्ष वेद जैन यांच्या मते, या कायद्यामुळे नियमांची पुनर्रचना झाली असून स्पष्टता वाढेल. तर चार्टर्ड अकाउंटंट अमित पाठक यांच्या मते, “सरकारने करदात्यांवर विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला असून प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे.” (Income Tax Rules)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com