मुंबई : (Girgaon Gudi Padwa Rally) गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या २४ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही पर्यावरणपूरक संकल्पनेतून साकार होत आहे. या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी एका ठरावीक विषयावर आधारित कागदापासून तयार केलेली पर्यावरणपूरक प्रतीकृती सादर केली जाते.
यंदा ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘वंद्य वंदे मातरम्’ ही संकल्पना घेण्यात आली आहे. या संकल्पनेला पूरक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २२फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. मूर्ती तयार करताना आतमध्ये बांबूचा सांगाडा वापरून बाहेरून कागदाच्या साहाय्याने पर्यावरणपूरक रचना करण्यात आली आहे. ही मूर्ती गितेश पवार आणि गौरव पवार या भावंडांनी मेहनतीने साकारली असून, मूर्तीच्या डोळ्यांची सुबक आखणी हितेश समेळ यांनी केली आहे. होळीनंतर या कामाला सुरुवात करण्यात आली होती आणि आता अंतिम टप्प्यात ही कलाकृती पूर्णत्वास जात आहे. पर्यावरणपूरकता आणि देशभक्तीचा संदेश देणारी ही शोभायात्रा यंदाही नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक