US Israel and Iran Conflict: होर्मुझ सामुद्रधुनीवर तणाव वाढला! ट्रम्प यांच्याकडून '७' देशांना...

Total Views |
 
US Israel and Iran Conflict
 
मुंबई : (US Israel and Iran Conflict) अमेरिका, इस्त्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे सात देशांनी युद्धनौका पाठवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. (US Israel and Iran Conflict)
 
एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे आणि येथून जगातील सुमारे २० टक्के तेलाची निर्यात होते. त्यामुळे हा मार्ग खुला ठेवण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्य आवश्यक आहे." (US Israel and Iran Conflict)
 
“तेलावर अवलंबून देशांनी पुढे यावे...”
 
ट्रम्प यांनी या सात देशांची नावे जाहीर केली नसली तरी मध्यपूर्वेतील तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या देशांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले. (US Israel and Iran Conflict)
 
त्यांनी उदाहरण देताना म्हटले आहे की, चीनला सुमारे ९० टक्के तेल होर्मुझ सामुद्रधुनीतून मिळते, तर अमेरिकेला अत्यल्प प्रमाणात तेल या मार्गाने मिळते. त्यामुळे या प्रदेशातील सुरक्षेसाठी इतर देशांनीही जबाबदारी घ्यावी. (US Israel and Iran Conflict)
 
हेही वाचा: UP Gas Cylinder Raid: नेत्याच्या हॉटेलमध्ये तब्बल ८८ बेकायदेशीर गॅस सिलेंडर! काळाबाजारासाठी साठवणूक की...? 
 
इराणवर अमेरिकेचा दबाव?
 
ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेच्या कारवायांमुळे इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यांच्या मते, इराणची हवाई संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे, ड्रोन आणि क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता घटली आहे. त्यासोबतच, अमेरिकेने इराणच्या काही लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. (US Israel and Iran Conflict)
 
पुढे ट्रम्प यांनी असेही नमूद केले की, अमेरिकेचे सैन्य जगातील सर्वात शक्तिशाली असून गरज पडल्यास कारवाई सुरूच राहील. (US Israel and Iran Conflict)
 
इराणची प्रतिक्रियास काय?
 
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, अनेक देशांनी त्यांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी तेहरानशी संपर्क साधला आहे. काही देशांच्या जहाजांना सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र युद्ध संपवण्याबाबत अमेरिकेशी चर्चा करण्याचे कोणतेही कारण सध्या दिसत नासल्याचेही ते म्हणाले. (US Israel and Iran Conflict)
 
जागतिक तेल बाजारावर परिणाम...
 
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक तेल बाजारावर दबाव वाढला आहे.
 
कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त झाल्या आहेत.
 
अमेरिकेत पेट्रोलचे दरही प्रति गॅलन ७० सेंटपेक्षा जास्त वाढले आहेत.
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com