Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार; राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

    24-Feb-2026   
Total Views |
 
Rajya Sabha
 
मुंबई : (Rajya Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून पार्थ अजित पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या २ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होणार असून त्यासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. (Rajya Sabha)
 
राज्यसभेच्या निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या फौजिया खान, काँग्रेसच्या रजनी पाटील, उबाठा गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, भाजपचे डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. (Rajya Sabha)
 
दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Rajya Sabha)
 
हेही वाचा: Rajya Sabha: राज्यसभेवर पार्थ पवारांची एन्ट्री पक्की? महाविकास आघाडीकडून शरद पवारांचं नाव चर्चेत 
 
राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्याची मागणी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, येत्या २६ फेब्रुवारी रोजी वरळीतील एनएससीआय डोम सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक होईल. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली जाणार असल्याचे समजते. (Rajya Sabha)
 
भाजपतर्फे उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरु
 
भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात ४ उमेदवार उतरवले जाणार आहेत. या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी रात्री १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Rajya Sabha)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....