ठाणे : (Bangladeshi) ठाणे मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या ठाण्यात फेरीवाले बनून व्यवसाय करत होते, यामुळे स्थानिक नागरिकांना व्यवसायापासून दूर राहावे लागत होते , बांगलादेशी नागरिकांकडे बनावट आधारकार्ड असल्याने भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतः रस्त्यावर उतरून या बांगलादेशी बोगस फेरीवाल्यांना हटवले असल्याचे त्यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले.
मागील कित्येक महिने बांगलादेशातील नागरिक बोगस पद्धतीने ठाण्यात येऊन व्यापार करत आहेत. यामध्ये ठाण्यातील मुख्य बाजारपेठ येथील रस्ता अडवून स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय करून या ठिकाणी जागा अडवून व्यापार सुरू होता. या सगळ्याबाबत वारंवार तक्रारी भाजपच्या महिला नगरसेवक मृणाल पेंडसे यांना येत होत्या, त्यांनी पोलिस प्रशासनाकडे देखील धाव घेतली होती, परंतु पोलिस प्रशासन यांनी बघ्याची भूमिका घेतली. यामुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक ठाण्यात येऊन व्यापार करतात याकडे पोलिसांनी का दुर्लक्ष केले? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
गुरुवारी मृणाल पेंडसे यांनी स्वतः मुख्य मार्केट परिसरात बोगस बांगलादेशी व्यापारावर आक्रमक होऊन, त्यांना तेथून पळवून लावले, यानंतर पोलिस आणि ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग दाखल होऊन कारवाई करण्यात आली. यामुळे मुख्य मार्केट परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. बांगलादेशी बोगस व्यापाऱ्यांना एक हिंदू महिलेने सामना करत त्यांच्यावर कारवाई केली आणि बांगलादेशी हटाव मोहीम सुरू केली, यामुळे भाजपा नगरसेवक मृणाल पेंडसे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बांगलादेशी हटाव मोहीम सुरूच राहणार - मृणाल पेंडसे
ठाण्यात बांगलादेशी नागरिक येऊन बोगस पद्धतीने ठाण्यातील मार्केट परिसरात जागा अडवून व्यापार करत होते, या संदर्भात मला वारंवार नागरिक तक्रारी करत होते, यामुळे ठाणे मार्केट परिसरात गेले असता त्या ठिकाणी व्यापार करणाऱ्या बांगलादेशी नागरिक यांचे आधार कार्ड चेक केले असता आधार कार्ड बोगस असल्याचे कळले, यानंतर पोलिसांना कॉल करून सांगितले, त्यानंतर त्यांना तेथून हटवले. बोगस पद्धतीने बांगलादेशी नागरिक या ठिकाणी येऊन व्यापार करत आहेत, बोगस आधार कार्ड सोबत ठेवून आम्ही वाशी येथील आहोत असे सांगतात. यामुळे बांगलादेशी हटाव मोहीम सुरूच राहणार असे भाजप ठाणे महानगरपालिका नगरसेवक मृणाल पेंडसे यांनी सांगितले.