मुंबई : ( Love Jihad ) बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात एका गैरहिंदू युवकाने फूस लावून हिंदू मुलीसोबत निकाह केला होता. मात्र, अवघ्या एका आठवड्यानंतर ती युवती घरी परतली आहे. तिच्या येण्याने कुटुंबाने तिला जाब न विचारता तिचे मंदिरात शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी केली. शास्त्रानुसार, विधीवत कार्यक्रम करून तिचे शुद्धीकरण करण्यात आले. यानंतर तिने हनुमान चालीसा पठण केले.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या हिंदू युवतीने ३० डिसेंबर रोजी नियाझुल नावाच्या एका युवकासोबत लग्न केले. तसेच लग्नाची नोंदणी मुंगेर जिल्हा न्यायालयात देखील केली होती. तिच्या कुटुंबाने अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला. मुलीला आणि मुलाच्या कुटुंबाला स्टेशनला हजर केले असता मुलीने तिच्या पालकांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
आपली मुलगी आपल्यासोबत राहणार हे सांगत असल्याने मुलीच्या कुटुंबाने कोणतीही पूर्वग्रह मनात न ठेवता मुलीला स्विकारले. तसेच तिचा निकाह झाल्याने तिचे विधीवत शुद्धीकरण करून घरवापसी करण्यात आली.
मुलीच्या वडीलांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुलीला या प्रकरणातून बाहेर काढल्याने कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.