मुंबई : (Ameet Satam) "हा देश काँग्रेसमुक्त झाला. महाराष्ट्र काँग्रेसमुक्त झाला. काँग्रेसमधील अनेक लोकांनी मोदीजींच्या कामावर, देवेंद्रजींच्या कामावर प्रभावित होऊन या विकासयात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. जर पूर्ण देश काँग्रेसमुक्त होऊ शकतो तर धारावी काँग्रेसमुक्त का होऊ शकत नाही? आगामी निवडणुकीत धारावी काँग्रेसमुक्त करूया", असा नारा भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिला. धारावीत महायुतीच्या उमेदवार नीला जितू सोनवणे यांच्या नूतन कार्यालय उदघाटनवेळी बोलत होते. (Ameet Satam)
दरम्यान, बुधवार,दि.७ रोजी धारावीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष नीरज उभारे, धारावी विधानसभा मंडळ अध्यक्ष रमेश नाडार आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. धारावीतील शिवसेनेचे शाखाध्यक्ष पंकज लोकरे आणि पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. (Ameet Satam)
यावेळी बोलताना अमित साटम यांनी यांनी काँग्रेस आणि विरोध करणाऱ्या उबाठा सेनेला चांगलेच सुनावले. ते म्हणाले," धारावीतील भविष्यातील पिढीकरिता धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविला जात आहे. तो धारावीतील शेवटच्या माणसाची सेवा करण्यासाठी आहे. विरोधक या प्रकल्पाला विरोध करत आहे. मात्र हे विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. गरीब जनतेला घर मिळत असताना विरोध करत आहेत. परंतु येणाऱ्या काळात विरोधकांना धारावीतील जनताच उत्तर देईल. धारावीकरच त्यांना उत्तर देतील. तुमच्या उत्तराचा पहिला अध्याय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहाच्या सहा उमेदवार भाजप, शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणं हे पहिलं उत्तर असेल". (Ameet Satam)
पुढे माहित साटम म्हणाले," राज्य सरकारचा उद्देश साफ आहे. सरकारची नीती साफ आहे. सर्वांना घर मिळावी यादृष्टीने राज्य सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी हा प्रकल्प आणला आहे. काही लोकांना गरिबांना घर द्यायची नाही. त्यांना स्वतःची घर बनवायची आहेत. बंगले बांधायचे आहे. आपले काही विरोधक हे लपून छपून बिल्डरांना भेटतात. कंपनीच्या अधिकाऱ्यांना मेसेज पाठवतात. आम्हालाही येऊन भेटा, आम्हीही तुम्हाला सपोर्ट करतो. स्वतःच्या फायद्यासाठी गरिबांना घर मिळत असताना, गरिबांचे घरचे स्वप्न साकार होत असताना हे विरोध करणारे लोकांना जनता आता माफ करणार नाही. आपणच काय परमेश्वरही यांना माफ करणार नाही". (Ameet Satam)
पुढे धारावीकरांना आवाहन करताना ते म्हणाले," मी सर्व धारावीकराना आवाहन करतो, हात जोडून विनंती करतो तुम्हाला जर कोणी घर देऊ शकतो तर जगाच्या पाठीवर एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कौल द्यावा. महायुतीला कौल देऊन विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे काम येणाऱ्या १५ तारखेला करावे. येणाऱ्या काळात धारावी आपण काँग्रेसमुक्त करू शकू", असेही ते म्हणाले. (Ameet Satam)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.