निवडणूक साहित्यांनी दुकाने सजली

झेंडे, गमछ्यांसह प्रचार साहित्याला वाढती मागणी

    07-Jan-2026
Total Views |
Election Campaign Materials
 
मुंबई : ( High Demand for Election Campaign Materials in Mumbai ) मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून, विविध राजकीय पक्षांच्या प्रचार फेऱ्या आणि जनसंपर्क दौरे देखील आता मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. या प्रचार फेरीमध्ये लागणारे विविध राजकीय शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, भाजपा , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष आणि अपक्ष यांच्या प्रचारात लागणारे मफलर आणि झेंडे आणि इतर साहित्याला देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
 
खांद्यावर घालण्यात येणारे प्रचाराचे मफलर दहा रुपयांपासून सुरू होऊन ते अगदी दोनशे रुपयांपर्यंत मिळत आहेत. तर विविध राजकीय पक्षांचे छोटे झेंडे हे देखील २० रुपयांपासून सुरू होऊन मोठे झेंडे तीन मीटर अगदी तीनशे रुपयांपर्यंत मिळत आहेत.
फेटे देखील बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. या फेट्याची किंमत शंभर रुपयांपासून ते अगदी पाचशे रुपयांपर्यंत विविधडिझाईन केलेले फेटे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
 
हेही वाचा : मतदार छायाचित्रासह अंतिम मतदार याद्या मध्‍यवर्ती निवडणूक कार्यालयात विक्रीसाठी उपलब्‍ध
 
सगळ्याच पक्षाच्या साहित्याला मोठ्याप्रमात मागणी
 
लालबाग येथील दुकानदार कृष्णा यांनी सांगितले की,
"आम्ही गेल्या एका महिन्यापासून विविध राजकीय पक्षांचे मफलर, फेटे, झेंडे आणि गमछे बॉम्बे, गुजरात, महालक्ष्मी येथून मोठ्या प्रमाणात मागवलेले आहेत . आता प्रचार सुरू झाल्यामुळे सगळ्याच पक्षांच्या साहित्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे . आता सध्या व्हीआयपी मफलर्सना खूप मागणी आहे तसेच दीड मीटर व्हीआयपी मफलर्सची किंमत २२० आहे. एकंदरच खप वाढल्याने आम्ही पुन्हा एकदा ऑर्डर दिली आहे."
 
सध्या मोठ्याप्रमाणात उमेदवार आपली प्रचार फेरी तसेच जनसंपर्क दौऱ्याचे आयोजन करत आहे . याला मतदारांनी देखील मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलेला दिसतोय. त्यामुळे अनेक उमेदवारांची माणसे जास्त असल्याने आणि प्रचाराचे साहित्य कमी पडत असल्याने फार धावाधाव होते. आणि त्यामुळेच दुकानांमधील प्रचार साहित्याला मोठ्याप्रमात मागणी असल्याचे दिसून येते.