मतदार छायाचित्रासह अंतिम मतदार याद्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध
07-Jan-2026
Total Views |
मुंबई : ( Mumbai Municipal Voter List ) माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. महानगरपालिका निहाय संपूर्ण मतदारयादी जसजशी पूर्ण होईल तसतशी प्रसिद्ध करावी, असे आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार, माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून आज, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी २२७ प्रभागांपैकी २२६ प्रभागांची मतदान केंद्रनिहाय मतदार छायाचित्रांसहीत यादी महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे.
सदर याद्या बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ पासून संबंधित मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात विक्रीस उपलब्ध आहेत. नागरिक / राजकीय पक्षांनी संबंधित मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून या मतदार याद्या खरेदी कराव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.