मुंबई : ( Sabarimala Gold Theft ) शबरीमला मंदिरातील सोने चोरी प्रकरणात देवस्वोम बोर्डाचे माजी सदस्य केपी शंकर दास यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशात त्यांच्याविरुद्ध केलेल्या टिप्पण्या काढून टाकण्याची शंकर दास यांची याचिका फेटाळून लावली. यावेळी न्यायमूर्ती दीपांकर म्हणाले की, तुम्ही लोकांनी तर देवालाही सोडले नाही.
शबरीमला मंदिरातील सोने चोरीच्या प्रकरणात, केरळ उच्च न्यायालयाने के.पी. शंकर दास आणि के. विजयकुमार हे या गुन्हेगारी कटातून सुटू शकत नाहीत असा निर्णय दिला होता. त्यानंतर शंकर दास यांनी उच्च न्यायालयाची टिप्पणी रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु त्यांचे युक्तिवाद स्वीकारले गेले नाहीत आणि अपील फेटाळण्यात आले.
मंदिरातून सोने चोरीला गेल्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली. याप्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आली. हे पथक अनेक व्यक्तींची चौकशी करत आहे. एसआयटीने आतापर्यंत त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते एन. वासू आणि ए. पद्मकुमार यांना अटक केली आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.