मुंबई : ( Bob Blackman ) जयपूरमधील कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात, ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी भारताच्या एकतेवर आणि जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरच्या काही भागावर पाकिस्तानचा बेकायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरचे पुन्हा भारतामध्ये विलीन केले पाहिजे.
ते म्हणाले की, मी १९९२ पासून कलम ३७० रद्द करण्यास पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर ते कलम रद्द झाल्यानंतर आंनदोत्सव देखील साजरा केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा काश्मिरी पंडितांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आणि घरांमधून हाकलून लावण्यात आले होते, त्यावेळी आम्ही जगाला हा अन्याय दाखवण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी त्यांनी भारतीय लोकशाही आणि विकासाचे कौतुक केले. तसेच भारतासोबतच्या कायमस्वरूपी संबंध आणि सहकार्यावर त्यांचा विश्वास असल्याचे सांगितले. ब्लॅकमन यांनी सांगितले की, त्यांची भूमिका केवळ राजकीय समर्थन नाही तर ती मानवी हक्क आणि न्यायाच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे.
या कार्यक्रमात त्यांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देत भाषणाची सुरूवात केली. भारत हा लोकशाहीने चालणारा सर्वांत मोठा देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.