Navnath Ban : महाराष्ट्र विकासावर चालतो टोमण्यावर नाही : नवनाथ बन

    06-Jan-2026
Total Views |
 Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "महाराष्ट्र विकासावर चालतो टोमण्यावर नाही. याउलट ज्याठिकाणी मराठी माणूस राहतो त्याठिकाणीच पुनर्विकास करून त्यांना घर देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत.त्यामुळे चला हवा येऊ द्या सारखा नवीन मनोरंजन कार्यक्रम जो ग्रँट हयात मध्ये होणार आहे तो लोक नक्की बघतील पण मत मात्र भारतीय जनता पक्षाला देतील." असे प्रतिपादन भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवार दि. ६ रोजी केले. (Navnath Ban)
 
"औरंगजेबला गाडण्याच काम महाराष्ट्राने मराठी माणसाने केले आहे. राऊत यांनी औरंगजेबाचा कितीही उदोउदो केला तरी त्यांचे महाराष्ट्रद्रोही आणि हिंदुत्वविरोधी विचार गाडले जातील. आणि विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीत देखील विरोधकांना जनता धडा शिकवेल." असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
 
हेही वाचा : Ramdas Athawale : दिवंगत अरविंद कुंवर यांचे शहादा येथे स्मारक उभारणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 
 
"प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाक्याचा विपर्यास केला गेला.लातूर जनतेला माहीत आहे रविंद्र चव्हाण काय म्हणाले आहेत. लातूरचा विकास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात होईल आणि लातूर महापालिका भाजपच जिंकेल." असे बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)
 
"छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताच आराध्य दैवत आहेत.त्यांना महाराष्ट्रापुरत मर्यादित करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने संजय राऊत करीत आहेत. महाराजांचा इतिहास असा आहे की तो स्वाभिमानाने संपूर्ण जगात सांगितला पाहिजे.पण राऊत यांना अफजलखान प्रिय आहे. मुंबईत याकुब मेमनच्या कबरीच सुशोभीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना केल होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्ववादी विचार यांनी सोडून दिले आहेत.आणि सत्तेसाठी काँग्रेसची दलाली केली.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार उबाठा ला नाही आहे." असेही बन यांनी सांगितले. (Navnath Ban)
 
"निवडणूक आयोग ही भाजपची बी टीम नाही तर संजय राऊत आणि उबाठा ही काँग्रेसची सी टीम झाली आहे. निवडणूक आयोग त्यांचे काम योग्य करीत आहे आणि काही आरोप असतील तर त्याच उत्तर आयोग नक्की देईल. "असेही बन यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)