Ramdas Athawale : दिवंगत अरविंद कुंवर यांचे शहादा येथे स्मारक उभारणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

    06-Jan-2026
Total Views |
 
Ramdas Athawale
 
मुंबई : (Ramdas Athawale) नंदुरबार जिल्हयातील रिपब्लिकन चळवळीचे अभ्यासु आणि संघर्षशील नेते दिवंगत अरविंद कुंवर यांचे शहादा येथे स्मारक उभारुन त्यांच्या स्मृती जोपासल्या पाहिजेत. अरविंद कुंवर यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांनी दलित आणि आदिवासींवरील अन्यायाचा नेहमी प्रतिकार केला. अन्यायाला वाचा फोडली, दलित-आदिवासींच्या एकजुटीसाठी त्यांनी भरीव काम केले आहे. अरविंद कुंवर सारख्या कार्यकर्त्यांची प्रेरणा समाजातील नवीन पिढीला मिळावी यासाठी अरविंद कुंवर यांच्या स्मृति प्रित्यर्थ एखादे सभागृह उभारले पाहिजे. अरविंद कुंवर यांच्या स्मृति प्रित्यर्थ शहादा येथे स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करु, त्यांच्या स्मारकासाठी माझ्या खासदार निधीतुन 20 लाख रुपयेही देणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले. स्थानिक आमदार राजेश पाडवी यांनाही या स्मारकासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. 
 
रिपब्लिकन पक्षाचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष दिवंगत अरविंद कुंवर यांच्या जाहीर श्रध्दांजली सभेत ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी ना. रामदास आठवले यांनी दिवंगत अरविंद कुंवर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. अरविंद कुंवर यांच्या कुटूंबियांचे ना. रामदास आठवले यांनी त्यांच्या निवासस्थानी जावुन सात्वंनपर भेट घेतली. दिवंगत अरविंद कुंवर यांच्या श्रध्दांजली सभेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले , स्थानिक आमदार राजेश पाडवी, रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबासाहेब खंबाळकर, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी रमेश मकासरे भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील;शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी;मोहन शेवाळे; बापूजी जगदेव; रिपाइं चे धुळे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ; प्रभाकर जाधव; अनिलकुंवर आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. यावेळी दिवंगत अरविंद कुंवर यांचे कुटुंबीय ऊषा बाई अरविंद कुंवर;महेंद्र आणि चंद्रशेखर कुंवर तसेच त्यांची मुलगी वैशाली जयवर्धन तायडे आदी कुंवर कुटुंबीय उपस्थित होते. (Ramdas Athawale)
 
हेही वाचा : Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साताऱ्याच्या संमेलनात ८ कोटी, ७२ लाख रुपयांची पुस्तक विक्री 
 
दिवंगत अरविंद कुंवर यांनी अनेक वर्ष भारतीय दलित पँथर पासुन रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन ना. रामदास आठवले यांना साथ दिली. रिपब्लिकन पक्षाचे नंदुरबाज जिल्हयाचे ते 20 वर्ष जास्त काळ जिल्हा अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्हयात रिपब्लिकन चळवळीचे काम चांगले केले आहे. दलित आणि आदिवासींच्या एकजुटीसाठी त्यांनी चांगले काम केले. दलित - आदिवसींवर होणा-या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. दलित पँथरपासुन त्यांनी अनेक आंदोलने केली. अशा नंदुरबार जिल्हयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात अरविंद कुंवर यांचा मोठा वाटा होता. अरविंद कुंवर यांचे काम चांगले आहे. त्यांच्यासारखे गावोगावी कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले. म्हणुनच मी केंद्रात मंत्री पदापर्यंत पोहचु शकलो असे ना. रामदास आठवले म्हणाले. दलित आणि आदिवासींना सामजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. (Ramdas Athawale)
 
राजीव गांधी नेहमी सांगत असत पेंद्र सरकारचा जो निधी आहे तो समाजातील शेवटच्या माणसांपर्यत पोहचला पाहिजे. तो निधी गाव पातळीपर्यंत पोहचतांना 100 पैशांपैकी केवळ 15 पैसेच पोहचले जातात आणि 85 टक्के पैसे मध्यल्यामध्ये गायब होतात, ही खंत दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी व्यक्त केली होती. आता मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे. भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठरलेत, देशात केंद्र सरकारचा प्रत्येक पैसा गावपातळीपर्यंत पोहचत आहे. गावागावाचा विकास होत आहे. देशात अनेक ठिकाणी रस्ते निर्माण होत आहेत. त्यातुन गाव जोडली जात आहेत. गावां बरोबर मनांनाही जोडण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीत आहेत. विकासाच्या माध्यमातुन गावागावाचा विकास करुन ते देशाचा विकास करीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचा संपूर्ण निधी हा गाव पातळीपर्यंत पोहचत आहे त्यासाठी प्रधानमंत्री मोदी दक्ष असतात असेही ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले. (Ramdas Athawale)
 
यावेळी दिवंगत अरविंद कुंवर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली, जेव्हा जेव्हा आम्ही पलटवु रिपब्लिकन चळवळीचा पन्ना, तेव्हा तेव्हा आम्हाला आठवत राहतील अरविंद कुंवर अण्णा अशी काव्यमय श्रध्दांजली ना.रामदास आठवले यांनी यावेळी वाहिली. (Ramdas Athawale)