मुंबई : (Illegal mosque) उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील हाजीपूर गावात दोन अवैध बेकायदेशीर मशिदी आणि एक मदरसा हटवण्याची प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती. सोमवार दि. ०५ रोजी या नोटीसीचा शेवटचा दिवस होता. मात्र, प्रशासनाने बुलडोजर लावून कारवाई करण्याच्या आधीच तेथील स्थानिक मुस्लिमांनी रविवारच्या एका रात्रीत छन्नी आणि हातोड्याने मशीद ध्वस्त केली. (Illegal mosque)
मिळालेल्या माहितीनुसार, हाजीपूर गावातील १३३९ चौरस मीटर सरकारी जमिनीवर अवैधपणे मशीद उभारण्यात आली होती. त्याचबरोबर त्याच गावात अजून एक अवैध मशीद आणि मदरसा पाडण्याची नोटीस देऊन कारवाई न केल्याने प्रशासनाने बुलडोझरने कारवाई केली. लोकांनी स्वत: हून पाडलेल्या मशीदीचा राडारोडा प्रशासनाने बुलडोझरने हटवला. (Illegal mosque)
तेथील मुस्लिमांनी केलेले कृत्य पाहून तेथील तहसीलदार धीरेंद्र प्रताप सिंह म्हणाले, देवाने या लोकांना स्वतःच बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची बुद्धी दिली, हे नशिबच आहे. यावर संभलचे जिल्हाधिकारी राजेंद्र पेन्सिया म्हणाले की, हाजीपूर गावात मदरशाच्या नावाखाली देखील जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. परंतु मदरसा न चालवता दुकाने बांधून भाडे वसूल केले जात होते. (Illegal mosque)
आता कळलं का लोकांनी मशीद का पाडली?
तहसीलदार धीरेंद्र प्रताप सिंह म्हणाले, स्थानिक मुस्लिमांनी एका रात्रीत मशीद का पाडली हे शोधले असता, आढळले की, तिथे गेली कित्येक वर्ष अवैधपणे सरकारी वीज चोरून वापरली जात होती. सरकारने मशीदीवर कारवाई करताना वीजचोरीचा भांडाफोड होऊ नये यासाठीच त्यांनी स्वत: हून अवैध बांधकाम पाडले. (Illegal mosque)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.