ज्यांना वंदे मातरम् ची ॲलर्जी त्यांच्यासोबत आमचे जुने मित्र - देवेंद्र फडणवीस

    05-Jan-2026
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : ( Devendra Fadnavis ) "अलीकडच्या काळात ज्यांना वंदे मातरम् ची ॲलर्जी आहे त्यांच्या सोबत आमचे जुने मित्र बसू लागले आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी वचननामा पण जाहीर केला. पण वचननामा देण्याचा अधिकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना होता. आताचा वचननामा हा वाचूननामा आहे. कारण २०१७ साली ज्यांनी वचन दिली होती त्यातील एकही वचन यांना पूर्ण करता आलेले नाही . कारण हा वचननामा म्हणजे झ्युटोने झ्युटोसे कहा की सच बोलो." असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि.४ रोजी उत्तर मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
 
यावेळी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेल्या मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार गीताचे सादरीकरण करण्यात आले. मुंबई महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम,आमदार संजय उपाध्याय यांसह महायुतीचे उमेदवार आणि प्रमुख नेते उपस्थित होते.
 
हेही वाचा : BMC Election 2026 Survey: मुंबई महानगरपालिका भाजप-शिवसेनेची? नव्या सर्व्हेचे धक्कादायक अंदाज, सर्व्हेत नेमकं काय?
 
"२५ वर्ष काम केल्यानंतर त्याच त्याच गोष्टी करताना मनाची नाहीतर जनाची तर काही वाटली पाहिजे.काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांच्याप्रमाणे दोन युवराजांनी पण असे केले ज्यात त्यांनी सांगितले की मुंबईत चांगली शौचालय पण नाहीत. मग हे आम्हाला नको तुमच्या वडिलांना आणि काकांना विचारा.२० वर्षे जेल मध्ये असल्यासारखं होते तर मातोश्रीतून शिवतीर्थावर गेले मग जेल कशाला समजायचं. मुळात तुम्हाला जेलमध्ये घातलं कुणी ? राज ठाकरेंच्या देहबोलीवरून हा प्रीतिसंगम नाही तर भीतीसंगम आहे असेही वाटत होते."असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
"महायुतीच्या भितीमुळे हे एकत्र आले आहेत. त्यांची युती कार्टूनिस्ट आणि कॅमेरामन ची नाही तर कन्फ्युजन आणि करप्शन ची युती आहे.कारण यांच्याजवळ सांगण्यासारख काहीच नाही आहे.कारण मी चार वेळा सांगितल होते विकासावर यांचे भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा पण माझे हजर रुपये अजून खिशातच आहेत.
 
आम्ही गेल्या साडेसात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकास करून मुंबईचा चेहरा बदलला आहे.कारण आम्ही लोकांच्या समस्या समजणारी लोक आहोत.लौकरच शिवडीचा प्रश्न देखील अम्ही सोडवू. एस आर ए च्या माध्यमातून झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या मालकीचे घर आम्हाला द्यायचे आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबई करताना त्याठिकाणी राहणाऱ्या झोपडपट्टीवासियाना तिथेच घर द्यायचा आमचा मानस आहे."असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.