मैदान सोडून विरोधकांनी पळ काढला म्हणून बिनविरोध - अमीत साटम
05-Jan-2026
Total Views |
मुंबई : ( Amit Satam ) "मैदान सोडून विरोधकांनी पळ काढल्याने त्याठिकाणी फक्त महायुतीचे उमेदवार शिल्लक राहिले ते विजयी घोषीत केले आहेत.निवडणुकीचे मैदान सोडून ते पळाले आहेत आणि लोकशाहीचा खून त्यांनीच केला आहे. भूलथापा , फेक नेरेटिव्ह, खोट बोलणे हे सोडून यांच्याकडे कोणतेही काम राहिलेले नाही आहे.आमचा लोकशाहीवर विश्वास आहे जर काही असेल तर निवडणूक आयोग याबाबत पूर्ण अहवाल मागवेल आणि कारवाई करेल." असे परखड मत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केले.
"राष्ट्र प्रथम' या विचारधारेवर महाराष्ट्राचा अढळ विश्वास आहे. यामुळेच कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत."असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
"सत्ताधारी पक्षाचे जवळपास ७० नगरसेवक बिनविरोध निवडणून येणे हा जनतेचा कौल आहे.यावरून विरोधकांना जनमताची मान्यता नाही हे कळते. शरद पवार तसेच काँग्रेसने त्यांच्या ४० वर्षात अनेक वेळा निवडणुका बिनविरोध केल्या आहेत तेव्हा लोकशाहीचा खून झाला नाही का ? संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचे आरोप हे बावळटपणाचे आहेत." असे प्रतिपादन भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.
"बिनविरोध जर नगरसेवक निवडून येत असतील तर या त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि भाजपवर लोकांचा विश्वास आहे." असे मत भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी व्यक्त केले.
मनसेचे अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडीसाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करत दबावापोटी विक्रांत घाग यांनी अर्ज मागे घेतला असे सांगत काही व्हिडिओ माध्यमात दाखवले होते.पण प्रत्यक्षात असला कोणताही दबाव माझ्यावर न्हवता मी स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे अशी प्रतिक्रिया विक्रांत घाग यांनी माध्यमांना दिली.त्यामुळे हे बोलणे अविनाश जाधव यांच्या वरच उलटले आहे.