मुंबई : ( Narendra Modi ) सोमनाथ मंदिरावरील एक हजार वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स माध्यमावर एक भावनिक पोस्ट केली. यामध्ये मोदी म्हणाले की, सोमनाथ हे केवळ एक मंदिर नाही तर भारतीय संस्कृतीच्या शाश्वत चेतना आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. ते मंदिर म्हणजे भारतमातेच्या लाखो शूर पुत्रांच्या स्वाभिमानाची आणि अदम्य धैर्याची गोष्ट आहे, ज्यांनी या हल्ल्यांना न जुमानता भारतीय संस्कृती आणि सभ्यता जिवंत ठेवली.
मोदींनी मंदिराच्या झालेल्या विध्वंस आणि पुनरुत्थानाच्या ऐतिहासिक गाथेचे स्मरण करताना सांगितले की, सोमनाथ मंदिराने अनेक हल्ले सहन केले, परंतु वारंवार झालेल्या हल्ल्यांना तोंड देत ते आजही अभिमानाने उभे आहे. सोमनाथ मंदिरावर पहिल्यांदा हल्ला केला, या हल्ल्याचा उद्देश केवळ मंदिर नष्ट करणे नव्हता, तर भारताच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक भावनेला चिरडून टाकणे होता.
प्राचीन वैभवाने भारत जगाला पुन्हा मार्ग दाखवू शकतो
पंतप्रधान मोदी म्हणाले की, १०२६ मध्ये पहिल्या आक्रमणाच्या हजार वर्षांनंतरही आज खंबीरपणे उभे असलेले सोमनाथ आपल्याला प्रेरणा देते की जर उद्ध्वस्त मंदिर पुन्हा उभे राहू शकते, तर भारत देखील त्याच्या प्राचीन वैभवाने जगाला पुन्हा मार्ग दाखवू शकतो.
जानेवारी १०२६ मध्ये पहिले आक्रमण
गुजरातमधील प्रभास पाटण येथे असलेले सोमनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगांमध्ये एक प्रमुख स्थान आहे. त्यामुळेच इतिहासात हे मंदिर अनेक वेळा परकीय आक्रमणात लक्ष्य केले गेले. जानेवारी १०२६ मध्ये गझनीच्या महमूदने यावर पहिले आक्रमण केले.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.