मुंबई : (Navnath Ban) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र दिसत आहे. शोककाळात शपथविधी योग्य की अयोग्य, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. (Navnath Ban)
भाजप आमदार नवनाथ बन यांनी शपथविधीवर टीका करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत घटनात्मक परंपरेचा दाखला दिला आहे. “शोक असतो, पण घटनात्मक जबाबदाऱ्या थांबत नाहीत,” असं स्पष्ट मत नवनाथ बन यांनी व्यक्त केलं. राज्यकारभार आणि प्रशासन अखंड सुरू राहणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. (Navnath Ban)
दरम्यान, संजय राऊत यांनी, “अजूनही महाराष्ट्र अजित पवारांच्या जाण्यातून सावरलेला नाही,” असं म्हणत शोककाळात शपथविधी घेणं अयोग्य असल्याची भूमिका मांडली होती. यावर प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी इतिहासातील उदाहरण पुढे केलं. “अंत्यसंस्कारांआधी किंवा त्याच दिवशी शपथविधी झाल्याची उदाहरणं यापूर्वीही आहेत. हे काही नवीन नाही, ही घटनात्मक आणि राजकीय परंपरा आहे,” असं नवनाथ बन म्हणाले. त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरचा प्रसंग आठवून दिला. (Navnath Ban)
“१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी राजीव गांधी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला होता. देशाच्या स्थैर्यासाठी तो निर्णय घेण्यात आला होता. संजय राऊत यांनी राजीव गांधींचा शपथविधी आठवावा,” असा सवालही बन यांनी उपस्थित केला. (Navnath Ban)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.