Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना सक्षम करणे ही आमची जबाबदारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    03-Jan-2026   
Total Views |

Devendra Fadnavis
 
सातारा : (Devendra Fadnavis) लाडक्या बहिणींना सक्षम करणे ही आमची जबाबदारी असून महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीआई फुले यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न आम्ही करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. (Devendra Fadnavis)
 
यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभुराजे देसाई, आ. मकरंद पाटील, अतुल भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा :  Pramod Sawant : नव्याने गोव्यात आता तिसरा जिल्हा
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा रुढीवाद, विषमता, जातीवाद वाढला आणि मनुष्याने मनुष्याला मनुष्य समजणे बंद केले त्या त्या वेळी आपण सामाजिक, आर्थिक गुलामगिरीत गेलो. महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील रुढींविरोधात एक बंड पुकारला आणि स्त्रियांना अधिकार देण्याचा निर्णय केला. त्यांनी स्त्रियांना शिकवण्याचा निर्णय घेतला. भिडे वाड्याची पहिली शाळा सुरु झाल्यानंतर त्यांना रुढीवाद्यांच्या त्रासाचा सामना करावा लागला. परंतू, त्या खचल्या नाहीत. मुलांना शिकवणे, मुले दत्तक घेण्याचे काम केले. ज्यांचे कुणी नाही, ज्यांना समाजाने वाळीत टाकले त्यांना जवळ करणारी त्यांची आई सावित्रीआई होती. त्यामुळे या देशात ज्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते त्यातील एक प्रमुख नाव सावित्रीबाई फुले यांचे आहे." (Devendra Fadnavis)
 
स्मारकांतून क्रांतीची बीजे तयार होतील
 
"महात्मा ज्योतीराव फुले यांनी सगळ्या रुढीपरंपरा मोडून काढल्यानेच समाजात समता निर्माण करण्याचे कार्य मजबूत झाले. त्यामुळेच अशा आमच्या महनीय आणि प्रेरणास्त्रोत असलेल्या लोकांचे स्मारक असलेच पाहिजे. हे स्मारक आपल्याला त्यांच्या कार्याची आठवण देतेच पण त्यासोबतच लढण्याची प्रेरणासुद्धा देते. जेव्हा जेव्हा समाजात विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, आमच्या मुलींना दाबण्याचा प्रयत्न होईल, त्या त्या वेळी या स्मारकांतून क्रांतीची बीजे तयार होतील आणि समाजात हे करण्याची हिंमत कुणी दाखवणार नाही," असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगलीतून केला महापालिका प्रचाराचा शुभारंभ 
 
"मागच्या वर्षी याच दिवशी मी १० एकर जमीन स्मारकासाठी अधिग्रहित करण्याची घोषणा केली. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी रेकॉर्ड स्पीडमध्ये हे सगळे काम पूर्ण केले. पहिल्यांदाच घोषणा केल्यानंतर एक वर्षाच्या आत जागा मिळाली, आराखडा मंजूर झाला, टेंडर निघाले आणि कामाची सुरुवातही झाली. ग्रामविकास मंत्री म्हणून दिलेल्या जबाबदारीला सार्थ काम जयकुमार गोरे यांनी केले. महिलांना सक्षम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी देण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी याठिकाणी असतील. त्याचे प्रशिक्षण इथे असेल," असेही त्यांनी सांगितले. तसेच सातारा जिल्ह्यातील नायगावचे नाव नाव सावित्री आईंच्या नावाने करण्याच्या प्रस्तावाला विनाविलंब आमचे मंत्रिमंडळ मान्यता देईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
 
 
Devendra Fadnavis

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....