Ameet Satam : अमीत साटम यांच्या उपस्थितीत कार्यालय उद्घाटन संपन्न
03-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Ameet Satam) भाजपा ,शिवसेना, आरपीआय महायुतीचे वॉर्ड क्रमांक ७० चे अधिकृत उमेदवार अनिष मकवानी तसेच वॉर्ड क्रमांक ६७ मधील महायुतीचे उमेदवार दीपक कोतेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या उपस्थितीत पार पडला. (Ameet Satam)
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक रमेश मेहता यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच यावेळी माजी नगरसेविका सुनीता मेहता, आणि वॉर्ड क्रमांक ६७ मधील मंडळ अध्यक्ष भवन कामतेकर तसेच वॉर्ड अध्यक्ष शंकर शिंदे, माजी नगरसेवक संजय पवार, शिवसेनेचे पदाधिकारी पराग कदम, माजी नगरसेवक सुनील गणाचार्य तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना व आरपीआय महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. (Ameet Satam)