Ajit Pawar Plane Crash: 'अजितदादांचे जाणे महाराष्ट्रावर कोसळलेले मोठे संकट': चंद्रशेखर बावनकुळे

Total Views |


 
Ajit Pawar Plane Crash
 
बारामती: (Ajit Pawar Plane Crash) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावुक ट्विट करत, म्हणाले, 'महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने मी हादरून गेलो'. (Ajit Pawar Plane Crash)
 
 

नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे ट्विट


महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय अजितदादा पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील दुर्दैवी निधनाच्या बातमीने मी अक्षरशः हादरून गेलो आहे. मन सुन्न झाले आहे. या दुःखद बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही. (Ajit Pawar Plane Crash)

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे लोकनेते म्हणून अजितदादांचे व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील. (Ajit Pawar Plane Crash)
 
प्रशासनावरची त्यांची मजबूत पकड, कामाचा अफाट वेग आणि लोककल्याणाचा अखंड ध्यास या साऱ्यांमुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. अजितदादांचा प्रशासनातील अनुभव अतिशय समृद्ध होता. अनेकदा मी स्वतः त्यांच्याकडून सल्ला घेत असे, विविध विषयांवर त्यांच्याशी हक्काने चर्चा करीत असे. महायुतीत कार्य करत असताना अनेक प्रश्नांवर मोकळेपणाने संवाद साधण्याची त्यांची शैली मला नेहमी प्रेरणा देणारी वाटली. त्यांच्या सहवासातून मी स्वतः अनेक गोष्टी शिकलो. (Ajit Pawar Plane Crash)
 
अजितदादांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे जाणे नाही; ते महाराष्ट्रावर कोसळलेले एक मोठे संकट आहे. देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला आहे आणि मी माझा एक जिवलग ज्येष्ठ मित्र! अजितदादा आता आपल्यात नाहीत ही जाणीव अजूनही मनाला स्वीकारता येत नाही. (Ajit Pawar Plane Crash)
 
अजितदादांसह या अपघातात मृत्युमुखी पावलेल्या सर्वांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकीयांच्या आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. (Ajit Pawar Plane Crash)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com