सिंधुदुर्ग : ( BJP Candidates Elected Unopposed in Sindhudurg ) प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपले खाते उघडले आहे. नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषदेतही बिनविरोध उमेदवार निवडून येण्याचा सिलसिला सुरुच आहे.
हेही वाचा : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूकीत कोकणात भाजप-महायुती जोरदार अनेक उमेदवार बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार प्राची इस्वालकर, बांदा जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रमोद कामत, जाणवली जि. प. शिवसेना उमेदवार रुहिता राजेश तांबे, पडेल जिल्हा परिषदेच्या भाजप उमेदवार सुयोगी घाडी आणि बापर्डे जिल्हा परिषदेच्या उमेदवार अवनी अमोल तेली बिनविरोध निवडून आल्या आहेत. यासोबतच पंचायत समिती कणकवली येथील वरवडे पंचायत समितीतून भाजप उमेदवार सोनू सावंत बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच देवगड तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये पडेल येथील भाजपचे अंकुश यशवंत ठूकरूल, नाडण येथील गणेश सदाशिव राणे आणि बापर्डे पंचायत समितीतून संजना लाड बिनविरोध निवडून आल्या आहेत.