मुंबई : ( Rubika Liyaquat ) उद्या जर माझ्यावर काही संकट आले तर किंवा एखादा वाईट प्रसंग घडला तर मला वाचवण्यासाठी सौदी अरेबियातून कोणी येणार नाही, तर इथलेच हिंदू बांधव माझ्या मदतीला उभे राहणार आहेत, असे मत प्रसिद्ध टिव्ही निवेदिका रूबिका लियाकत यांनी व्यक्त केले. त्या राजस्थानातील उदयपूर येथील बडगाव परिसरात रविवारी झालेल्या विराट हिंदू संमेलनात बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, मी रोज नमाज अदा करते, रोजे करते आणि इस्लामला मानते. परंतु हे सर्व मी भारतमातेच्या कुशीत राहून करते. भारतीय संस्कृतीची मुळे मजबूत आणि सर्वात जुनी आहेत. भारतीय समाजात महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. कुटुंबांना सामाजिक मूल्ये आणि संस्कार देणाऱ्या माता या देशात सर्वात आधी पूजनीय असतात. हाच हिंदू संस्कृती आणि भारतीय वारसा आहे.
यावेळी महामंडलेश्वर उत्तम स्वामी महाराजांनी एकता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला, सर्व हिंदूंना एकजूट राहण्याचे आवाहन केले. यावेळी सामाजिक भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलश यात्रा यासारखे उपक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीची मूल्ये मजबूत करणे आणि समाजात सकारात्मक एकतेच्या भावनेला प्रोत्साहन देणे हे परिषदेचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.