मुंबई : (Zohran Mamdani) अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर, लगेचच झोहरान ममदानी यांनी सध्या तुरूंगात असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रात त्यांनी, "प्रिय उमर, मला कठीण काळात तुझे शब्द नेहमी आठवतात की, याच वेळात स्वत: ला खंबीरपणे उभे करता येऊ शकते. तुझ्या आई-वडिलांना भेटून खूप आनंद झाला. आम्ही सर्वजण तुझाच विचार करत आहोत." (Zohran Mamdani)
गेल्या एक जानेवारीलाच ममदानी यांनी कुराणवर हात ठेवून न्यूयॉर्कच्या महापौर पदाची शपथ घेतली होती. त्यांनी शपथ घेतली त्याच दिवशी उमर खालिदची साथी ब्युनोज्योत्स्ना लहिरी यांनी या पत्राचा फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. लहिरी यांनी यामध्ये सांगितले की, खालिदचे आई-वडिल साहिबा खानम आणि सय्यद कासिम रसूल इलियास हे डिसेंबर महिन्यात लग्नाच्या निमित्ताने अमेरिकेत गेले होते. त्यावेळी त्यांनी ममदानी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ममदानी यांनी खालिदच्या आई-वडिलांना हे पत्र दिले. (Zohran Mamdani)
या पत्रावरून ममदानी यांचे मुस्लिमधार्जिणे धोरण पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका होत आहे. कारण ते स्वत: ला भारतीय वंशाचे म्हणवून घेत असले तरी, बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हिंसाचारावर त्यांनी आतापर्यंत एक अवाक्षरही काढलेले नाही. त्यामुळे न्यूयॉर्क शहरात इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. (Zohran Mamdani)
उमर खालिद प्रकरण
२०१९ मध्ये केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) मंजूर केला. या कायद्याविरोधात २३ ते २६ फेब्रुवारी २०२० या काळात उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर हिंसा उसळली. या दंगलींमध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याप्रकरणात उमर खालिद याला दंगल घडवून आणल्याच्या आरोपाखाली UAPA बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. त्याप्रकरणात आतापर्यंत एकूण सहा वेळा उमर खालिदचा नियमित जामीन नाकारण्यात आला आहे. (Zohran Mamdani)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.