मुंबई : (Thackeray brothers) मुंबई महापालिका निवडणूकीला काही तास शिल्लक असताना ठाकरे बंधूंनी मतदानाआधीच एक नवा फेक नरेटिव्ह सेट करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूकीत बॅकअप म्हणून वापरण्यात येणाऱ्या PADU मशिनवरून त्यांनी टीका केली आहे. (Thackeray brothers)
याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "आजपर्यंत आम्ही ज्या निवडणूका पाहिल्या त्यामध्ये पाच वाजतानंतर निवडणूकीचा प्रचार संपल्यावर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्या पुढच्या दिवशी मतदान ही आतापर्यंतची प्रथा होती. पण सरकारला काय हवे यासाठी निवडणूक आयोग काम करत असून त्यांनी काल एक नवीन सूचना काढली. मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवार मतदारांना भेटू शकतात, असे त्यांनी सांगितले. ही नवीन प्रथा कुठून आली? विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत ती का नव्हती? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच आता त्यांनी पाडू (प्रिंटिंग ऑक्सीलरी डिस्प्ले युनिट) ही एक नवीन मशीन आणली असून ते कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितले नाही. त्यामुळे सतर्क राहा. निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे," असा आरोप त्यांनी केला. (Thackeray brothers)
वास्तविक, या मशीनबाबत महापालिकेच्या वतीने आधीच स्पष्टीकरण देण्यात आले. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) बेंगलुरु या कंपनीची M3A मतदान संयत्रे वापरण्यात येणार आहे. या मतदान यंत्राद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणई करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या कंपनीने विकसित केलेले पाडू युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, १४० पाडू महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. (Thackeray brothers)
बॅकअपसाठी मशीनचा वापर
याशिवाय या यंत्राची तशी फारशी गरज भासणार नाही. पण बॅकअपचा एक पर्याय म्हणून पाडू मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा वापर केल्या जाईल अशी माहिती पालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी दिली. तसेच राजकीय पक्षांना याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले असून मतमोजणीच्या दिवशी पुन्हा एकदा हे प्रात्यक्षिक देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तरीसुद्धा राज ठाकरे यांनी PADU मशिनचा मुद्दा करत नवा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसते. मात्र, आता जनता त्यांच्या या नरेटिव्हला बळी पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Thackeray brothers)
ही पराभवापूर्वीची तयारी - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यावर बोलताना महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आपला पराभव होणार, असे वाटत असल्याने त्यांची ही पराभवापूर्वीची तयारी आहे. ज्याठिकाणी काँग्रेस जिंकते तिथे मशीनला दोष देत नाही. पण जिथे ते हरणार आहेत, तिथे आतापासून पराभवाची तयार राज आणि उद्धव ठाकरे करत आहेत. मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे, हे त्यांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास आणि विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हा विश्वास महाराष्ट्रातील जनतेपर्यंत गेला आहे. त्यामुळे विरोधकांना निवडणूकीतील पराभव दिसतो आहे." (Thackeray brothers)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....