Bombay High Court: बिनविरोध याचिका हायकोर्टाने फेटाळली
14-Jan-2026
Total Views |
ठाणे: (Bombay High Court) राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, या बिनविरोध निवडींना अविनाश जाधव यांनी आव्हान देऊन मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती, यांच्या याचिका बरोबर ठाण्यातील अजेय जेया यांनी देखील याचिका हायकोर्टात दाखल केली होती. (Bombay High Court)
महानगरपालिका निवडणुकीत ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, याला आव्हान देत, मनसेचे अविनाश जाधव, यांच्या बरोबरच ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजेय जेया यांनी देखील मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती, यामध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या निकालावर स्थगिती द्यावी, निवडणुकीत केवळ एकच उमेदवार असला तरीही मतदारांना 'नोटा' हा पर्याय उपलब्ध करून द्यावा, उमेदवारांनी दबावाखाली किंवा प्रलोभनांना बळी पडून अर्ज मागे घेतल्याचा आरोप करत, याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली होती अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती, ती याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. या संदर्भात मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले कि, निवडणुकीची याचिका दाखल केली, माझ्या बरोबर अनेक याचिका दाखल झाल्या आहेत,बुधवारी अजेय जया यांची देखील याच विषयावर याचिका होती, यावर कोर्टाने सुनावणी केली असून ती याचिका कोर्टाने फेटाळली असून माझी याचिका कोर्टाने फेटाळली नसल्याचे मनसेचे अविनाश जाधव यांनी सोशिअल मीडियावर व्हिडीओ प्रकाशित करून प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. (Bombay High Court)