Bangladeshi Hindus : बांगलादेशी हिंदूंचा निवडणूक आयोगाला अल्टिमेटम!

    14-Jan-2026   
Total Views |
 
Bangladeshi Hindus
 
मुंबई : (Bangladeshi Hindus) बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी हिंदू अल्पसंख्यांकांवरील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. भीती आणि असुरक्षिततेच्या छायेखाली जगणाऱ्या हिंदू संघटनांनी आता थेट निवडणूक आयोगाला अल्टिमेटम दिल्याचे निदर्शनास आले आहे. बांगलादेशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याक संघटनांपैकी एक असलेल्या हिंदू-ख्रिश्चन-बौद्ध एकता परिषद आणि ढाकेश्वरी हिंदू सभा यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. सध्याच्या हिंसक वातावरणात हिंदू मतदारांना स्वतःची सुरक्षा वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते भीतीच्या छायेखाली जगत आहेत. अशा परिस्थितीत ते मतदान कसे करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Bangladeshi Hindus)
 
मिळालेल्या माहितीनुसार, या संघटनांनी अल्पसंख्याकांसाठी विशेषतः हिंदूंकरिता स्वतंत्र मतदान केंद्रांची मागणी केली आहे, जेणेकरून कोणत्याही दबावाविना आणि भीतीशिवाय ते मतदान करू शकतील. तसेच ज्या भागांत अल्पसंख्यकांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत, तेथे लष्कर किंवा विशेष सुरक्षा दल तैनात करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सततच्या हत्या आणि धमक्यांमुळे लोक मतदान केंद्रांपर्यंत जाण्याचीही हिंमत करू शकत नाहीत, असे संघटनांचे म्हणणे आहे. (Bangladeshi Hindus)
 
हेही वाचा :  मुंबईत बांगलादेशी घुसखोरांचा 'हॉकर्स जिहाद'; स्थानिक मराठी व्यावसायिकांच्या पोटावर गदा
 
हिंदू संघटनांची ही मागणी अशा वेळी आली आहे, जेव्हा बांगलादेशात हिंदूंवरील क्रूर अत्याचारांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेच्या मते, गेल्या महिन्यातच सांप्रदायिक हिंसाचाराच्या ५१ घटना नोंदवण्यात आल्या. त्यामध्ये १० हत्या, १० चोरी व दरोड्याच्या घटना, आणि घरे, दुकाने, मंदिरे ताब्यात घेणे, लूटमार व जाळपोळ अशा २३ घटना समाविष्ट आहेत. (Bangladeshi Hindus)
 
भारताची स्पष्ट भूमिका
 
भारताने बांगलादेश सरकारला अल्पसंख्यकांवरील हल्ल्यांना तात्काळ आणि कठोरपणे आळा घालण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अल्पसंख्यक, त्यांची घरे आणि व्यवसायांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. या घटनांना वैयक्तिक वाद, राजकीय मतभेद किंवा बाह्य कारणांशी जोडणे धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले. अशा दुर्लक्षामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते आणि अल्पसंख्यकांमध्ये भीती अधिक गडद होते, असा इशाराही त्यांनी दिला. (Bangladeshi Hindus)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक