भारतीय हॉकीसाठी गौरवचा क्षण! दक्षिण कोरियावर ऐतिहासिक विजय मिळवून आशिया चषकावर कोरलं नाव

    08-Sep-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (India Wins Hockey Asia Cup 2025) भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी आशिया कप २०२५ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या दक्षिण कोरियावर ४-१ असा दणदणीत विजय मिळवत जेतेपद पटकावले आहे. या विजयामुळे भारतीय संघाने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषक २०२५ साठी थेट पात्रता मिळवली आहे. बिहारमधील राजगीर येथील बिहार स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी हॉकी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाचे अभिनंदन करत, हा क्षण भारतीय हॉकी आणि भारतीय क्रीडा विश्वासाठी ऐतिहासिक ठरल्याचे म्हटले.

असा जिंकला भारतानं आशिया कप

सामन्याला सुरुवात होताच सुखजीत सिंहने पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता मात्र गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या क्वार्टरला सुरुवात होताच जुगराज सिंहला दोन मिनिटांसाठी सस्पेंड करण्यात आले होते. भारताचे दहा खेळाडू मैदानावर होते. मात्र, दक्षिण कोरियाच्या टीमला गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंहने गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

अर्ध्या वेळेपर्यंत भारत २-० अशा आघाडीवर होता. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दक्षिण कोरियाने चांगली सुरुवात केली. मात्र, गोल करण्यात भारतीय संघाला यश मिळाले. दिलप्रीत सिंहने त्याचा दुसरा गोल केला आणि भारत ३-० ने आघाडीवर पोहोचला. चौथ्या क्वार्टरमध्ये गोल करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये टक्कर पाहायला मिळाली. भारताचा अनुभवी खेळाडू अमित रोहिदास याने भारताकडून चौथा गोल केला. दक्षिण कोरियाच्या संघाला केवळ एकच गोल करता आला. भारताने या विजयासह २०१३ च्या आशिया कपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. त्यावेळी दक्षिण कोरियाने भारताला ४-३ असे पराभूत केले होते.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\