मुंबई : दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खान याला गुंड म्हटले आहे. दबंग सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनव कश्यप यांनी केले आहे. व्यावसायिक मतभेद आणि वैयक्तिक मतभेदामुळे सुरू झालेला हा वाद आता पुन्हा बॅालीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कश्यप यांनी सलमानच्या कुटूंबावरही टीका केली आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खानच्या अभिनय क्षेत्रातील आतापर्यंतच्या कामावर टीका केली आहे. सलमानला तो एक ’गुंड’ आहे, असे म्हटले आहे. दोघांमधला हा वाद फार जुना आहे. फक्त सलमानवरच नाही तर कश्यप यांनी त्याच्या कुटूंबावरही टीका केली. व्यावसायिक आणि वैयक्तिक मतभेदामुळे हा वाद फार काळापूर्वीच सुरू झाला होता मात्र, 'गुंड' या शाब्दिक टिप्पणीमुळे आता या वादाला तोंड फुटले आहे.
अभिनव कश्यप मुलाखतीमध्ये काय म्हणाले? अभिनव कश्यपने मुलाखतीमध्ये असा दावा केला आहे की, ''गेल्या २५ वर्षांपासून सलमानला अभिनयात रस नाही. सलमान क्वचितच त्याच्या कामात सहभागी होतो, केवळ एक उपकार म्हणून सेटवर येतो. अभिनयापेक्षा, सेलिब्रिटी असताना मिळणाऱ्या प्रसिद्धीवर त्याचं जास्त लक्ष असतं. फक्त सलमानवरच नाही तर खान कुटूंबावरही कश्यप यांनी टीका केली आहे. खान कुटूंब सूड घेणारे आहे आणि ते इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवतात, जर तुम्ही त्यांच्याशी सहमत नसाल तर ते तुमच्या मागे लागतात." कश्यप यांनी चित्रपट निर्माते म्हणून त्यांची प्रगती झाली नाही, याला खान कुटूंब कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
सलमान खान आणि अभिनव कश्यपच्या वादाचं कारण काय? दबंग हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते अभिनव कश्यप यांनी केले आहे. दबंग चित्रपटाची सर्व गाणी, ऍक्शन सिन देखील प्रेक्षकांना फार आवडले होते. हल्ली दबंग चित्रपटाच्या गाण्यांवर लोकं रिल देखील करताना दिसतात. दबंगला भरपूर यश मिळाले मात्र काही काळानंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक अभिनव कश्यप या दोघांमध्ये वाद सुरू झाला कारण कश्यप यांनी दबंगचा सिक्वल पार्ट प्रदर्शित न करण्याचा विचार केला होता, या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
सलमान हा सध्या आपल्याला बिगबॅसच्या सिझन १९ मध्ये दिसत आहे. पुढे तो काही अॅक्शन-ड्रामा आणि अॅक्शन-कॅमेडी सिक्वलमध्ये दिसू शकतो.