मुंबई : नवसाला पावणारा लालबागच्या राजाचे तब्बल २७ तासानंतर ही विसर्जण झालेले नाही. सकाळी आठ वाजता राजा गिरगाव चौपाटीवर विसरजणासाठी पोहोचला मात्र तराफ्यावर मुर्ती ठेवण्यात अडचण आली आणि समुद्राला भरती आल्यामुळे लालबागच्या राजाचं अद्याप विसरजण झालेले नाही.
अनंत चतुर्दशीला दूपारी १२ वाजता निघालेल्या लालबागच्या राजाचं विसर्जण सोहळा दुसऱ्या दिवशी सकाळी संपन्न होतो मात्र ह्यावर्षी मुर्ती विसरजीत करण्यात अडचण आल्यामुळे राजाचे विसर्जण हे लांबणीवर गेले आहे. समुद्राला भरती आल्यामुळे विसर्जणाची कार्यकर्त्यांनी वाट पाहिली मात्र गिरगाव चौपाटीवर खास राजासाठी तयार केलेल्या तराफ्यावर राजाची मुर्ती ठेवण्यात कार्यकरत्याना अडचण येतं होती.
''लालबागच्या राजाचं विसर्जण हे भरती आणि ओहोटीवर विसंबुण असते. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचण्या आधीचं भरती आली होती, कार्यकरत्यानी विसर्जण करण्याचा प्रयत्न करून बघितला मात्र मुर्ती ही ट्रॅाली वरूण तराफ्यावर ठेवली जाते मग ती अरबी समुद्रामध्ये विसर्जीत होते. 'कोळी बांधवाण'चा सल्ला घेलत्यानंतर राजाचे विसर्जण हे रात्री साडे दहा नंतर होईल'' असे लालबागचा राजा मंजळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांनी माध्यमांना सांगितले.