नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ प्रेरित संघटनांच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांची बैठक जोधपूर येथे शुक्रवारपासून सुरू झाली. पहिल्या सत्रात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पार्पण केले. तीन दिवसांच्या (५-७ सप्टेंबर) बैठकीत ३२ संघटनांचे अखिल भारतीय पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
बैठकीच्या प्रारंभ विविध संघटनांनी आपापल्या क्षेत्रातील नव्या प्रयोगांची माहिती दिली. या बैठकीला रा. स्व. संघाचे सर्व 6 सहसरकार्यवाह, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार, संघटनमंत्री मिलिंद परांडे, राष्ट्र सेविका समितीच्या मुख्य संचालिका शांताक्का, प्रमुख कार्यवाहिका ए.सीता गायत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजशरण शाही, संघटन मंत्री आशिष चौहान, सक्षमचे अध्यक्ष दयालसिंह पवार, संघटनमंत्री चंद्रशेखर, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकांत, भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संघटनंमत्री बी. एल. संतोष, वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सत्येंद्र सिंह, संघटनमंत्री अतुल जोग आणि सीमा जागरण मंचाचे संयोजक मुरलीधर बैठकीस सहभागी आहेत.
समन्वय बैठकीत वर्षभराच्या कार्याची आणि त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण होईल. तसेच पंच परिवर्तन (सामाजिक सौहार्द, कुटुंब ज्ञान, पर्यावरणपूरक जीवन, स्व-आधारित निर्मिती, नागरी कर्तव्य पालन), संघ शताब्दी वर्षाचे कार्यक्रम आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रयत्नांवर चर्चा केली जाईल. अनुभवांची देवाणघेवाण, दिशानिर्देश आणि सूचना आणि समन्वय या उद्देशाने जोधपूरमध्ये आयोजित ही बैठक ७ सप्टेंबर रोजी संपेल.