मुंबई, स्वच्छता ही सेवा २०२५ हा उपक्रम या वर्षी दि. दि.१७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२५ कालावधी मध्ये राबविण्यात येत आहे. स्वच्छता ही सामुहिक जबाबदारी आहे. 'स्वच्छता' सर्वघटकातील लोकांना एकत्र आणणारी ही मोहीम आहे. भारत पेट्रोलियमतर्फे स्वच्छता,कचरा वर्गीकरण आणि कचरामुक्त भारताचे महत्त्व शाळांमध्ये समजावे यासाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता रॅली, प्रतिज्ञा व विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत असे तेल उद्योग राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भारत पेट्रोलियम आणि भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने स्वच्छता हा उपक्रम राबवण्यात आला होता.या कार्यक्रमास रेल्वेचे अधिकारी वरिष्ठ डीसीएम बी. अरुण कुमार, एसीएम राजीव रंजन, स्टेशन प्रबंधक (उपनगरीय आर के पंडा), रेल्वे पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर इन्चार्ज सुहास मनोहर, भारत पेट्रोलियमचे मुख्य प्रबंधक दिपक वाघ, मुख्य प्रबंधक मनोज काकडे, वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव यावेळी उपस्थित होते.
उमेश कुलकर्णी म्हणाले की, एक दिवस, एक तास, एकत्र हा उपक्रम, स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत आहे. शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी तसेच सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि कचरामुक्त भारताचे महत्त्व शाळांमध्ये होण्यासाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता रॅली, प्रतिज्ञा व विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
उमेश कुलकर्णी म्हणाले की, स्वच्छता उत्सव या मोहिमेच्या अंतर्गत रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती व स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सफाई मित्र यांचाही सन्मान या कार्यक्रमात केला गेला. स्वच्छ व सुंदर भारत देश साकारण्याचा प्रत्येक नागरिकाचे योगदान असणे आवश्यक आहे असे आवाहन केले