मुंबई, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले दि. २५ सप्टेंबर रोजी पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरिस्थिमुळे मराठवाड्यातील शेतीची फार मोठी हानी झाली आहे.हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
मुंबईतुन रेल्वे ने सोलापुरला जाऊन सोलापुर वरुन धाराशिव,लातुर,जालना या भागातील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणुन पुरग्रस्ताच्या झालेल्या नुकसानीचे पाहणी ना. रामदास आठवले करणार आहेत.त्यांनतर ते औरंगाबाद मार्गे दिल्लीला रवाना होतील.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक गावात अतिवृष्टीमुळे मुकी जनावरे दगावली आहेत.शेतकऱ्यांची झालेली भरुन काढण्यासाठी राज्य शासनाने २ हजार २१५ कोटींचे पॅकेज जाहिर केले आहे.त्यानुसार तातडीने नुकसान झालेल्या पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले पुरग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
शेतकऱ्यांना अधिकाअधिक मदत मिळवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे ना.रामदास आठवले प्रयत्न करणार आहेत.शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या आसमानी संकटाच्या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्ष ; राज्य सरकार ; केंद्र सरकार शेतकऱयांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी ना. रामदास आठवले धाराशिव ; बोरगाव बोरखेडा; भूम परांडा; वाशी ; बीड ; लातूर आणि जालना या भागाची पाहणी करणार आहेत.