नवी दिल्ली, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश न्यायमूर्ती न्यायमूर्ती भूषण गवई, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, विविध केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
With all your blessings and wishes , I am blessed and honoured to be sworn in as the 15th Vice President of India.