सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान, राष्ट्रपतींनी दिली शपथ

    12-Sep-2025   
Total Views |
sushia karki 
 
काठमांडू : (Sushila Karki) नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांत उसळलेल्या तरुणांच्या निदर्शनांनंतर आणि राजकीय उलथापालथीनंतर अखेर अंतरिम सरकार स्थापनेच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान बनल्या आहेत. शुक्रवारी रात्री राष्ट्रपती भवन शीतल निवास येथे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना शपथ दिली. सध्या, इतर कोणालाही मंत्री बनवण्यात आलेले नाही.
राष्ट्रपतींनी पुढील सहा महिन्यांत संसदेची नवीन निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे.सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश देखील राहिल्या आहेत. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
 याप्रकरणी राष्ट्रपती, लष्करप्रमुख आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींसह सलग अनेक बैठका घेण्यात आल्या. सर्वानुमते तटस्थ प्रतिमा असलेल्या सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधानपदी निवड झाली. संसदही बरखास्त करण्यात आली असून आता या सरकारवर पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत देशाला स्थैर्य देण्याची जबाबदारी आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\