मुंबई : माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा गौरव 'मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५' देऊन करण्यात आला. 'माई मीडिया २४' प्रस्तुत मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने व प्लँनेट मराठी अक्षय बर्दापूरकर यांच्या सहकार्याने पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
मा.ना. विधान परिषद उपसभापती ,डॉ. नीलम गोऱ्हे यांना साहित्य क्षेत्रातील -ऐतिहासिक कार्यासाठी मीडिया एक्सलन्स २०२५ अवॉर्ड्स ने गौरविण्यात आले. यावेळी 'माई मीडिया २४' च्या कार्याचं कौतुक करताना व्रतासारखं सातत्याने हे काम करत राहणं हे खरचं अभिनंदनीय असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं. 'माई मीडिया २४' च्या यापुढील सर्व उपक्रमांना शुभेच्छा देताना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी दिले.
"पद्मश्री पुरस्काराचा आनंद आहेच पण या पुरस्कारानंतर तुम्ही माध्यम प्रतिनिधींनी आपलेपणाने हा पुरस्कार मला दिला तो माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असल्याची भावना पद्मश्री अभिनेते अशॊक सराफ यांनी व्यक्त केली.
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आभार व्यक्त करताना "संवादासाठी आवश्यक कलांची जाण आणि संवाद साधण्याची वृत्ती असलेली माणसेच खरी माध्यमधर्मी असतात. इतर सारे माध्यमकर्मी. प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात माध्यमधर्मी माणसेच अपेक्षित सुधारणा घडवून आणू शकतील. पारंपरिक माध्यमांमध्ये त्यांना यासाठी अनुकूल वातावरण मिळत नसेल तर त्यांनी बाहेर पडून नवमाध्यमाची कास धरावी कारण निखळ, निकोप संवादाची आज नितांत गरज आहे".असं मत ज्येष्ठ पत्रकार नितीन केळकर यांनी व्यक्त केलं.
थँलसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या साथ संस्थेच्या सुजाता रायकर यांनी माई मिडिया चे आभार व्यक्त करुन थँलसेमियाविरोधात ही लढाई सर्व सहभागातून यशस्वी करु शकू,महाराष्ट्र सरकारने आम्ही माई मिडिया च्या माध्यमातून निवेदन देतो आहोत सूचना व नियंत्रण सूचना देत आहोत त्याची अंमलबजावणी सरकारी पातळीवर केली तर मोठं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
"या पहिल्या वहिल्या पत्रकार पुरस्कार सोहळ्यात माझ्या कामाची दखल घेतली याचा आनंद असून यापुढेही माझ्या या पत्रकार मित्रांसाठी चांगलं काम करीन" असं आश्वासन अभिनेते विजय पाटकर यांनी यावेळी दिलं. अभिनेते जयवंत वाडकर, दिपक करंजीकर यांनीही या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या पुरस्कार सोहळ्याच्या समन्वयक, प्रो. 'माई मीडिया २४' व मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल हरीष करदेकर यांनी यावेळी सांगितले की, "आज माध्यमांचे स्वरूप बदलत चालले आहे. अशावेळी इतर काय करतात यापेक्षा आपण काय वेगळं करू शकतो या विचारातून मी हा पुरस्कार सोहळा करण्याचे ठरवले. या पत्रकारितेच्या वाटचालीत मला अनेक चांगले स्नेही मिळाले त्यांनी मला प्रोत्साहन, दिलं. अनेक जण खूप चांगली कामे करीत असतात अशा मान्यवरांचा सन्मान करायला मिळणं हे आमचं भाग्य आहे. समाजासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्याची संधी ‘माई मीडिया २४' ला मिळाली हा आमचा देखील गौरव आहे" अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. रविराज इळवे, कामगार कल्याण कार्य -महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त म्हणाले की "मंडळाच्या इतिहासात प्रथमच माझा म्हणजे च.आमच्या मंडळाच्या कार्याचा गौरव झाला हा ऐतिहासिक पुरस्कार आहे. आणखी जास्त काम करण्याची ऊर्जा मिळाली "
"चांगल्या कार्यक्रमाचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करताना अशा पुरस्कारांनी शाबासकीची जी थाप आपल्या पाठीवर पडते ती अजून चांगले काम करण्यासाठी खूप प्रेरणादायी ठरते’ अशी भावना सर्व सन्मानित मान्यवरांनी यावेळी बोलून दाखविली. एकापेक्षा एक बहारदार लोककलाविष्कार आणि त्याला मिळणारी उपस्थितांची उत्स्फूर्त दाद यामुळे 'मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५ ‘ नेत्रदीपक झाला.
आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत. इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.