छत्तीसगढमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

    26-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली
: विशेष प्रतिनिधी छत्तीसगढमध्ये नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

छत्तीसगढमधील अबुझमाड येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत सुरक्षादलांनी दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य, इन्सास, रायफल, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

सुरक्षादलांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यातील कोहकामेता पोलीस स्टेशन परिसरात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. माड विभागातील नक्षलवाद्यांवर ही कारवाई सुरू होती. मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आले असल्याच्या माहितीवरून नारायणपूर आणि कोंडागाव येथील जिल्हा राखीव रक्षक आणि विशेष कार्य दलाचे (एसटीएफ) जवान त्यांच्या मागावर होते. २५ जून रोजी रात्री उशीरा सुरू झालेल्या या चकमकीमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.