औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं भोवलं! माजी आमदारावर गुन्हा दाखल

    25-Jun-2025
Total Views |


मुंबई :
नाशिकमधील मालेगाव विधानसभेचे माजी आमदार आसिफ शेख यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे चांगलेच भोवले आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी आसिफ शेख यांनी एका कार्यक्रमात औरंगजेबाची स्तुती केली होती. "औरंगजेब हा एक पवित्र व्यक्ती होता. तो टोप्या शिवून आपला उदरनिर्वाह करायचा. औरंगजेब सर्व धर्मांचा सन्मान करत होता. परंतू, महाराष्ट्रात फक्त औरंगजेबाला बदनाम करण्यासाठी त्याचे राजकारण सुरु करण्यात आले आहे," असे ते म्हणाले.


दरम्यान, आता याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसिफ शेख हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. २०१९ मध्ये मालेगाव मध्यवर्ती मतदारसंघातून त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. परंतू, यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मागील वर्षी आसिफ शेख यांनी 'इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र' (इस्लाम) हा नवीन पक्ष स्थापन केला.