"लांडग्याच्या पुढची औलाद..."; हगवणेंच्या वकिलाच्या युक्तीवादावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
29-May-2025
Total Views |
मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाचे वकील ॲड. विपुल दुशींग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. यावर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील त्या वकीलाला खडेबोल सुनावले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "खवीसाला कसे सगळेच खवीस मिळत जातात तसे हे हगवणे आणि त्यांची बाजू मांडणारे आहेत. पोरीला हालहाल करून मारून टाकलीत. अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता. अरे हरामखोरांनो लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची. माणसं नाहीच तुम्ही. पाईपाने मारमार मारलं. शरीराचा कुठला भाग असा नव्हता ज्यावर मारहाणीचे व्रण नव्हते."
"हे असले युक्तीवाद करून काय साध्य करायचंय तुम्हाला? पुणे पोलिस एकेक पुरावा गोळा करा. वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरच लटकायला हवेत यांचे जीव जाईस्तोवर," अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.
कोर्टात काय घडलं?
बुधावारी पार पडलेल्या सुनावणीवेळी संपूर्ण हगवणे कुटुंबाला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी "वैष्णवी एका अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करत असून ते आम्ही पकडले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार झाल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकीलाने केला आहे. तसेच नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणे म्हणजे छळ नाही. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती," असाही युक्तीवाद वकीलाने केला होता.